सौरभ गांगुलीची मुंबई उच्च न्यायालयात धाव! कारण काय?

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी पर्सेप्ट टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड आणि पर्सेप्ट डी मार्क (इंडिया) लिमिटेडच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. व्यावसायिक कराराबाबत लवादाने दिलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी गांगुली यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

मालमत्ता जाहीर करण्याची हमी कंपनीच्या वतीने देण्यात आली होती

पर्सेप्ट टॅलेंट मॅनेजमेंट लिमिटेड आणि पर्सेप्ट डी मार्क (इंडिया) मालमत्ता घोषित करावी आणि सुनावणी होईपर्यंत मालमत्तेचे व्यवहार करण्यासाठी मनाई करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. या याचिकेवर न्या. बी.पी. कुलाबावाला यांच्या एकलपीठापुढे सुनावणी झाली. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन संबंधित कंपन्यांनी केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई का करू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे. मालमत्ता जाहीर करण्याची हमी कंपनीच्या वतीने देण्यात आली होती. संबंधित कंपनी आणि गांगुली यांच्यामध्ये व्यावसायिक करार झाला होता. मात्र, तो ऐनवेळी गैरप्रकारे रद्द झाला. त्यामुळे प्रकरण लवादाकडे दाखल करण्यात आले होते. यासंदर्भात लवादाने दिलेल्या आदेशांवर अंमलबजावणीसाठी गांगुली यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

(हेही वाचा ‘टी २०’ विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर! भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here