- ऋजुता लुकतुके
बीसीसीआयने (BCCI) बुधवारी संध्याकाळी २०२४-२५ या नवीन क्रिकेट हंगामासाठी खेळाडूंबरोबरच्या कराराचं नूतनीकरण केलं. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत यशस्वी पदार्पण करणारे युवा खेळाडू आता कराराच्या यादीत आले आहेत. तर रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांना ए प्लस दर्जाचा करार मिळाला आहे. तर ए श्रेणीतही आर अश्विन, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, के एल राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश करण्यात आला आहे. (BCCI Contracts)
बीसीसीआय (BCCI) दरवर्षी मध्यवर्ती कराराची यादी जाहीर करत असते. आणि खेळाडूंची कामगिरीच्या जोरावर ४ श्रेणींमध्ये वर्गवारी केली जाते. ए प्लस श्रेणीतील करारबद्ध खेळाडूंना वार्षिक ७ कोटी रुपये मिळतात. आणि ए श्रेणीच्या क्रिकेटपटूंना ५ कोटी रुपये, बी श्रेणीच्या क्रिकेटपटूंना ३ कोटी रुपये तर सी श्रेणीच्या खेळाडूंचा १ कोटी रुपये अशी कराराची रक्कम आहे. (BCCI Contracts)
खेळाडूंना सामन्याच्या फी व्यतिरिक्त वर्षाला ठोस रक्कम मिळावी यासाठी करारांची ही पद्धत सुरू झाली. आणि तेव्हापासून बीसीसीआय (BCCI) ठरावीक खेळाडूंना वर्षासाठी करारबद्ध करत असतं. (BCCI Contracts)
(हेही वाचा – Google Gemini AI : ‘आमची चूक झाली,’ असं जेमिनीबाबत म्हणण्याची वेळ सुंदर पिचाई यांच्यावर का आली?)
चहल, धवन, पुजारा, यादव यांना करारपत्र नाही
नवीन करारांचं विश्लेषण करताना कुणाला करारपत्र मिळालं, कुणाला नाही याची चर्चाही होणारच. आणि यंदा महत्त्वाची नावं जी इथं नाहीएत ती आहेत चेतेश्वर पुजारा, शिखर धवन, यजुवेंद्र चहल आणि उमेश यादव यांची करारातून हकालपट्टी झाली आहे. त्यामुळे या चौघांचा विचार पुढील वर्षी अभावानेच होणार हे स्पष्ट आहे. (BCCI Contracts)
अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा विचार इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी होईल, अशी शक्यता होती. पण, निवड समितीने पचतिशीतील पुजारा आणि अजिंक्य यांचा विचार करण्याऐवजी रजत पाटिदार आणि सर्फराझ खान या युवा खेळाडूंची निवड केली. या खेळाडूंनी आपल्यावरील विश्वासही सार्थ ठरवला आहे. त्यामुळे पुजारासाठी आता भारतीय संघाचे दरवाजे बंद झाल्यात जमा आहेत. (BCCI Contracts)
यजुवेंद्र चहल मात्र अजूनही ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे तो संघात पुनरागमनाच्या आशा बाळगू शकतो. अगदी दोनच वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये तो पर्पल कॅपच्या स्पर्धेत होता. त्यामुळे मायदेशात तो अजूनही प्रभावी ठरू शकतो. शिखर धवन आणि उमेश यादव यांच्यासाठी मात्र आता पुनरागमन कठीण असणार आहे. (BCCI Contracts)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community