अंपायरिंगचे शतक पूर्ण करणाऱ्या Anil Dandekar यांचा बीसीसीआयकडून सत्कार

अनिल दांडेकर  (Anil Dandekar) यांची या क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात ज्येष्ठ अंपायर माधव गोठस्कर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दांडेकर यांनी या क्षेत्रात सुरु केलेला प्रवास शंभर सामान्यांपर्यंत येऊन ठेपला आहे. 

64
सेलम येथे होणाऱ्या तमिळनाडू विरुद्ध चंदीगड रणजी ट्रॉफी सामना हा अंपायर अनिल दांडेकर (Anil Dandekar) यांच्या कारकिर्दीतील प्रथम श्रेणी सामन्यातील पंच म्हणून १०० वा सामना असणार आहे.  त्यांच्या या कामाबद्दल त्यांचा बीसीसीआयच्या वतीने सत्कार करण्यात आला. अनिल दांडेकर हे ज्येष्ठ अंपायर माधव गोठस्कर यांचे शिष्य आहेत. माधव  गोठस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी क्रिकेटमधील अंपायरिंगचे धडे गिरवले.  गोठस्कर हे अत्यंत अनुभवी पंच म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी या क्षेत्रात मोठे नवा कमावले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले अंपायर दांडेकर  (Anil Dandekar) हेही या क्षेत्रात उत्तम भूमिका निभावत आहेत.
२३ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान तमिळनाडूतील सेलम क्रिकेट फाउंडेशन ग्राउंडवर तामिळनाडू आणि चंदीगड यांच्यातील रणजी ट्रॉफी सामना हा दांडेकर  (Anil Dandekar)  यांचा मैदानी पंच म्हणून १०० वा प्रथम श्रेणी सामना असणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम करणाऱ्या दांडेकर यांनी १९९० मध्ये वयाच्या २२ व्या वर्षी बॉम्बे क्रिकेट असोसिएशनने घेतलेल्या पंच परीक्षेत उत्तीर्ण होऊन पंचगिरीची आवड जोपासण्यास सुरुवात केली. आपल्या कठोर परिश्रम, समर्पण, एकाग्रता आणि वचनबद्धतेच्या जोरावर, दांडेकर यांनी १९९७ मध्ये बीसीसीआयने घेतलेल्या पंच परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि १९९९ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
ते २००५ मध्ये बीसीसीआयने घेतलेल्या अखिल भारतीय पॅनेल पंच परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरी आणि अनुभवामुळे, ऑस्ट्रेलियातील शेफील्ड शिल्ड सामने आणि दक्षिण आफ्रिकेतील सनफॉइल मालिकेत पंच म्हणून त्यांची निवड झाली. बीसीसीआयने २०१६-१७ हंगामासाठी दांडेकर  (Anil Dandekar) यांना भारताचे सर्वोत्तम स्थानिक पंच म्हणून घोषित केले. २०१७-१८ हंगामातील रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात त्यांनी आपली कामगिरी बजावली तेव्हा त्यांनी त्यांच्या शिरपेचात आणखी एक भर घातली. एकूणच, दांडेकर यांनी आतापर्यंत ८७ रणजी ट्रॉफी सामने, चार दुलीप ट्रॉफी सामने, दोन शेफील्ड शिल्ड सामने, दोन सनफॉइल मालिका सामने आणि चार टूर सामने, तसेच लिस्ट ए, टी२०, वयोगटातील सामने आणि इतर ३०० हून अधिक बीसीसीआय सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे.
दांडेकर  (Anil Dandekar) यांची या क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात ज्येष्ठ अंपायर माधव गोठस्कर यांच्या नेतृत्वाखाली सुरु झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दांडेकर यांची सुरु झालेली कारकीर्दने एक अनोखे शतक गाठले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.