T20 विश्वचषकात भारताच्या पराभवानंतर BCCI संतापले; राहुल, रोहितसह विराटसोबत घेणार बैठक

टी-२० विश्वचषकात भारताचा १० गडी राखून पराभव झाल्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) संघाच्या या कामगिरीवर अतिशय नाराज झाले आहे. BCCI लवकरच एका बैठकीचं आयोजन करणार आहे. या बैठकीत प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि भारताचा माजी कर्णधार व अनुभवी फलंदाज विराट कोहलीला प्रश्न केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

( हेही वाचा : पोस्टात फक्त ५ हजार गुंतवा, आयुष्यभर कमाई करा; काय आहे ही भन्नाट सरकारी योजना!)

BCCI चे अध्यक्ष टीम इंडियाच्या संपूर्ण कामगिरीचा आढावा घेणार आहेत. BCCI लवकरच बैठक आयोजित करणार असून संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पुनरावलोकनात संघाचे ऐकणे देखील महत्त्वाचे आहे. रोहित, द्रविड, कोहली यांचे मत ऐकून भविष्यात संघ बांधणी कशाप्रकारे केली जावी यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे BCCI च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

भारताच्या सलामी जोडीची फ्लॉप कामगिरी

भारताचे सलामीवीर केएल राहूलने आणि रोहित शर्माने टी २० वर्ल्डकपमध्ये साजेशी कामगिरी केली नाही, याचा संपूर्ण परिणाम विश्वचषकात जाणवला. त्यामुळे अनेकांनी भारताच्या सलामी जोडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पॉवर प्लेमध्ये रन्स बनवणे कठिण गेले याची कल्पना आता सर्वांना आली आहे त्यामुळे या सगळ्यावर BCCI चर्चा करणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here