- ऋजुता लुकतुके
सध्याचे भारतीय संघाचे (Team India) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ जून महिन्यात संपत आहे. त्यामुळे नवीन प्रशिक्षक निवडण्यासाठी बीसीसीआयने आता अधिकृतपणे अर्ज मागवेल आहेत. इच्छूक उमेदवारांनी ऑनलाईन आपले अर्ज भरायचे आहेत. बीसीसीआयला आता साडेतीन वर्षांसाठी प्रशिक्षकाची नियुक्ती करायची आहे. आणि अर्ज करण्याची मुदत २७ मे पर्यंत आहे. (BCCI Head Coach)
‘बीसीसीआयची (BCCI) क्रिकेटविषयक समिती प्रशिक्षकाची निवड करेल. अर्जांची छाननी, वैयक्तिक मुलाखती यातून निवडलेल्या संभाव्य उमेदवारांच्या कामगिरीचा सखोल अभ्यास करून योग्य उमेदवाराची निवड केली जाईल,’ असं बीसीसीआयने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणारा टी-२० विश्वचषक संपला की लगेच १ जुलैपासून नवीन प्रशिक्षक कामाची सूत्र हातात घेतील आणि त्यांची मुदत ही डिसेंबर २०२७ पर्यंत असेल. (BCCI Head Coach)
(हेही वाचा – T20 World Cup 2024 : रोहित, आगरकर यांना हार्दिक संघात नको होता?)
बीसीसीआयचा हा आहे निकष
प्रशिक्षकाला मिळणारा मोबदला हा निगोशिएबल असेल असं बीसीसीआयने म्हटलं आहे. काही वर्षांपूर्वी बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी आपले निकष जाहीर केले होते. त्यानुसार, किमान ३० आंतरराष्ट्रीय कसोटी सामने आणि ५० एकदिवसीय सामने खेळलेली व्यक्त मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकते. ही व्यक्ती ६० वर्षांपेक्षा जास्त वयाची असता कामा नये, असाही एक बीसीसीआयचा निकष आहे. (BCCI Head Coach)
मागची अडीच वर्षं राहुल द्रविड भारताचे मुख्य प्रशिक्षक आहेत आणि अलीकडे टी-२० विश्वचषकापर्यंत त्यांना मुदतवाढ दिली होती. आता त्यांना जर पदावर कायम राहायचं असेल तर त्यांना नव्याने अर्ज करावा लागेल असं बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अलीकडेच स्पष्ट केलं होतं. पण, मूळात द्रविड वैयक्तिक कारणांमुळे पदावर कायम राहू इच्छित नाहीत, असं समजतंय. (BCCI Head Coach)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community