- ऋजुता लुकतुके
बीसीसीआयने नुकताच २०२५ हंगामातील भारतीय संघाचा देशांतर्गत क्रिकेट कार्यक्रम जाहीर केला आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत भारतीय संघ वेस्ट इंडिज (West Indies) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) संघांबरोबर दोन कसोटी मालिका खेळणार आहे. या कालावधीत भारतीय संघ ४ कसोटी, ३ एकदिवसीय सामने आणि ५ टी-२० सामने खेळणार आहे. भारताच्या देशांतर्गत हंगामाची सुरुवात ऑक्टोबरमध्ये वेस्ट इंडिजबरोबरच्या मालिकेपासून होईल. कसोटी अजिंक्यपदाच्या (Test Championship) दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची ठरेल. कारण, २०२५ मध्ये भारतीय संघ ५ कसोटी इंग्लंड विरुद्ध इंग्लंडमध्ये आणि प्रत्येकी दोन कसोटी वेस्ट इंडिज (West Indies) आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (South Africa) मायदेशात खेळणार आहे. (BCCI International Fixtures)
- १ ली कसोटी – २ ऑक्टोबर ते ६ ऑक्टोबर – वि. वेस्ट इंडिज (अहमदाबाद)
- दुसरी कसोटी – १० ते १४ ऑक्टोबर – वि. वेस्ट इंडिज (कोलकाता)
Mark your dates 🗓️
Test series vs West Indies ✅
All-format series vs South Africa ✅
Here’s Team India’s (Senior Men) schedule for the International Home Season 2025 🔽#TeamIndia | #INDvWI | #INDvSA | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZJZJ4HFbLa
— BCCI (@BCCI) April 3, 2025
वेस्ट इंडिजचा (West Indies) संघ परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ भारतात तीनही प्रकारच्या मालिका खेळण्यासाठी येणार आहे. विशेष म्हणजे या मालिकेत गुवाहाटी इथं पहिली कसोटी रंगणार आहे. त्यानिमित्ताने गुवाहाटीत पहिली आंतरराष्ट्रीय कसोटी (First international test) होणार आहे. नवी दिल्ली (New Delhi) आणि गुवाहाटीत (Guwahati) दोन कसोटी पार पडतील. त्यानंतर ३ एकदिवसीय सामने आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका भारत (India) आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान रंगणार आहे. (BCCI International Fixtures)
हेही वाचा –
Join Our WhatsApp Community