प्रदूषण ही सर्वात मोठी समस्या आहे. आणि प्रदूषणाचा विचार करून भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शहा यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातील वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या वर्ल्डकप २०२३ च्या सामन्यापूर्वी एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान आणि सामन्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार नाही.( IND vs SL World Cup 2023)
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी या विषयी आयसीसीशी अधिकृतरित्या चर्चा केली. त्यानंतर मुंबईतील सामन्यात फटाक्यांची आतिषबाजी न करण्याचा निर्णय घेण्यात आला.जय शहा यांनी सांगितलं की, ‘बीसीसीआय हे पर्यावरणाविषयी सजग आहे. मी हा विषय आसीसीसमोर अधिकृतरित्या मांडला आणि सांगितले की मुंबईत कोणतीही आतिषबाजी होणार नाही. ( IND vs SL World Cup 2023)
(हेही वाचा : Mahua Moitra : खासदारांची हेरगिरी करण्याचा प्रयत्न, महुआ मोईत्रा यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र)
यामुळे प्रदुषणात वाढ होऊ शकते. क्रिकेट बोर्ड हे पर्यावरणाविषयीच्या लढ्यासाठी प्रतिबद्ध आहे. आम्ही आमचे चाहते आणि भागधारकांना सर्वोच्च प्राधान्य देतो.’जय शहा यांनी या निर्णयाची घोषणा करताच चाहते शहा आणि बीसीसीआयवर नाराज झाले. सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. हिंदूंचा प्रसिद्ध सण दिवळी अवघ्या काही दिवसांवर आला आहे. बीसीसीआयचा हा निर्णय लोकं त्याच्याशी जोडून पाहत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community