भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय टी-२० क्रिकेट सामन्यात आता एक नवा नियम आणण्याच्या तयारीत आहे. या नियमानंतर संघ ११ ऐवजी १५ खेळाडूंसह मैदानात उतरू शकतो. या नव्या नियमाचे नाव इम्पॅक्ट प्लेअर रूल असे असून क्रिकेटपूर्वी हा नियम ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश प्रिमीअर लीगमध्ये फुटबॉल आणि हॉकीसारख्या खेळांसाठी लागू आहे. बीसीसीआय देखील आता हा नियम लागू करण्याच्या तयारीत असल्याने आयपीएल २०२३ मध्येही याची अंमलबजावणी होईल, असेही सांगितले जात आहे.
(हेही वाचा – NLEM: केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेमुळे महागडी औषधं मिळणार स्वस्त!)
बीसीसीआयचे सर्व राज्यांना परिपत्रक
बीसीसीआयने या नियमांतर्गत सर्व राज्यांना एक परिपत्रक पाठवलं आहे, ज्यामध्ये टी-२० क्रिकेटची वाढती लोकप्रियता पाहता आता काहीतरी नवीन आणण्याची तयारी सुरू असल्याचे पत्रात म्हटले आहे. यामुळे खेळाडू आणि संघासाठी हा खेळ अधिक मनोरंजक बनवता येईल.
नक्की काय आहे हा नवा नियम
इम्पॅक्ट प्लेअर या नियमानुसार, सामन्यात अतिरिक्त खेळाडूंना संघात ठेवता येणार आहे. जेव्हा नाणेफेक होईल, त्यावेळी दोन्ही संघाचे कर्णधार चार पर्यायी खेळाडूंच्या पर्यायासह त्यांची प्लेईंग इलेव्हन जाहीर करतील. या चार पर्यायी खेळाडूंपैकी एकच खेळाडू सामन्यात वापरता येईल, यासाठी संघात खेळत असलेल्या एखाद्या खेळाडूला मध्येच थांबवून पर्यायी खेळाडूला खेळवता येऊ शकते. विशेष म्हणजे कोणत्याही संघाने इॅम्पॅक्ट प्लेअर वापरायला हवा, अशी सक्ती नाही. या नियमानुसार कोणत्याही डावाची १४ षटकं होण्यापूर्वी इम्पॅक्ट प्लेअरला वापरता येऊ शकतं.
Join Our WhatsApp Community