भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गांगुली यांना कोलकाता येथील वुडलँडस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय.
दोन्ही डोस घेतल्यानंतरही लागण
गांगुली यांना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत होती. काल रात्री त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही त्यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
(हेही वाचा – “कोण अजित पवार? मी नाही ओळखत”, नारायण राणेंचा हल्लाबोल)
Sourav Ganguly, BCCI President, got admitted at Woodlands Multispeciality Hospital on Dec 27 with Covid status. He received monoclonal anti-body cocktail therapy and is currently stable: Dr Rupali Basu MD & CEO, Woodlands Hospital, Kolkata pic.twitter.com/otP8NBNiOv
— ANI (@ANI) December 28, 2021
वर्षभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल
सौरभ गांगुली वर्षभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात दाखल होत आहेत. जानेवारीमध्ये गांगुली यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लॅस्टीनंतर करण्यात आली होती. अँजिओप्लॅस्टीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. पण, त्यानंतर पुन्हा त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर गांगुली बरे झाले आणि पुन्हा एकदा बीसीसीआयमध्ये सक्रीय झाले होते.
Join Our WhatsApp Community