गांगुलीचा मोठा खुलासा, कोहलीला दिला होता सल्ला, मात्र…

182

मागच्या चोवीस तासांत क्रिकेटच्या विश्वात नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बुधवारी विराट कोहलीची वनडेच्या    कर्णधार पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर बीसीसीआयवर विराटच्या चाहत्यांनी ताशेरे ओढायला सुरुवात केली. चाहत्यांच्या या तीव्र नाराजीनंतर बीसीसीआयने कोहलीचे आभार मानले आहेत. आता यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मोठा खुलासा केला आहे. मी त्याला टी-20 प्रकाराचं कर्णधारपद सोडू नको असा सल्ला दिला होता, मात्र कोहलीने माझा सल्ला धूडकावला, असं गांगूलीने म्हटले आहे.

चर्चा करुन घेण्यात आला निर्णय 

कोहलीवर आयसीसीचे एकही जेतेपद न पटकावू शकलेला कर्णधार असा ठपका ठेवून कर्णधार पदावरून दूर करण्यात आले. पद सोडण्यासाठी बोर्डाने त्याला ४८ तासांचा अवधी दिला होता, अशी चर्चा असताना गांगुली यांचा खुलासा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. कोहलीने टी-२० चे नेतृत्व सोडताना वर्कलोड व्यवस्थापनामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले होते. बीसीसीआयने त्यावेळी देखील त्याच्या निर्णयाचा सन्मान राखला. एएनआयशी बोलताना गांगुली म्हणाले, ‘कोहलीकडून वन-डे नेतृत्व काढून घेण्याचा निर्णय बीसीसीआयने निवडकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतर घेतला.

कसोटी कर्णधारपदी कायम

खरेतर बीसीसीआयने कोहलीला टी-२० चे नेतृत्व सोडू नकोस, असे बजावले होते. मात्र, तो आमच्या मताशी सहमत नव्हता. मग निवडकर्त्यांचे मत पडले की क्रिकेटमध्ये दोन वेगळे कर्णधार असायला हवे. त्यामुळे विराट हा कसोटी कर्णधारपदी कायम असेल तर रोहित हा वन-डे आणि टी-२० संघाचे नेतृत्व करेल, असा निर्णय झाला.’

 ( हेही वाचा: अवकाशात झेपावणार ‘आदित्य’! )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.