BCCI Prize Money : देशांतर्गत क्रिकेटमध्ये बक्षिसाची रक्कम वाढणार, रणजी सामनावीराला मिळणार ‘इतके’ पैसे

BCCI Prize Money : बीसीसीआयने नवीन हंगामापासून देशांतर्गत क्रिकेटमधील बक्षिसांमध्ये मोठी वाढ केली आहे. 

68
BCCI Prize Money : देशांतर्गत क्रिकेटमध्ये बक्षिसाची रक्कम वाढणार, रणजी सामनावीराला मिळणार ‘इतके’ पैसे
  • ऋजुता लुकतुके

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात, बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटपटूंसाठी मोठी घोषणा केली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये ज्येष्ठ व ज्युनिअर गटातही महिला व पुरुषांच्या स्पर्धांमध्ये बक्षिसाच्या रकमेत मोठी वाढ करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव शाह यांनी एक ट्विट करून बोर्डाच्या नव्या निर्णयाची माहिती दिली. यात महत्त्वाचा बदल असा आहे की, ज्युनिअर व महिलांच्या देशांतर्गत सर्व स्पर्धांमध्ये आता सामनावीर पुरस्कार विजेत्या खेळाडूंना रोख रक्कमही मिळणार आहे. यापूर्वी फक्त चषक दिला जात होता.

एवढेच नाही तर सिनियर पुरुष क्रिकेटच्या दोन महत्त्वाच्या स्पर्धा, विजय हजारे ट्रॉफी आणि सय्यद मुश्ताक अली टी-२० टूर्नामेंटमध्ये अशा पुरस्कारांसह बक्षीस रक्कम दिली जाईल. रणजी ट्रॉफीमध्ये बक्षिसाची रक्कम यापूर्वीच देण्यात येत आहे. (BCCI Prize Money)

(हेही वाचा – CM Eknath Shinde यांचा विरोधकांना टोला; म्हणाले विधानसभेची हंडी…)

यासाठी केली होती मॅच फीमध्ये वाढ करण्याची घोषणा 

जय शाह यांच्या या निर्णयामुळे देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या कमाईत नक्कीच वाढ होईल आणि अधिकाधिक खेळाडूंना त्यांच्या कामगिरीत आणखी सुधारणा करण्याची प्रेरणा मिळेल. बीसीसीआयच्या (BCCI) सचिवांनीही या निर्णयाचे कारण सांगितले. ते म्हणाले की, या निर्णयामुळे बोर्डाला देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या चांगल्या कामगिरीची ओळख होईल आणि त्यांना बक्षीस पण मिळेल. हा निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी बीसीसीआयच्या सर्वोच्च परिषदेचे आभार मानले आणि देशातील क्रिकेटपटूंसाठी चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवण्याबद्दलही बोलले.

जय शाह यांच्या कार्यकाळात देशांतर्गत क्रिकेटला चालना देण्यासाठी पावले उचलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तर गेल्या ३-४ वर्षात बीसीसीआयने पुरुष संघातील तसेच महिला क्रिकेट आणि देशांतर्गत क्रिकेटमधील खेळाडूंची कमाई वाढवण्याचे काम केले आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच बोर्डाने कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या मॅच फीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती. दोन वर्षांपूर्वी बोर्डाने तिन्ही फॉरमॅटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये महिला खेळाडूंची मॅच फी पुरुष खेळाडूंच्या बरोबरीची करण्याची घोषणाही केली होती. यापूर्वी बोर्डाने रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंच्या मॅच फीमध्येही जवळपास दुप्पट वाढ केली होती. (BCCI Prize Money)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.