- ऋजुता लुकतुके
बीसीसीआयचे माजी सचिव जय शाह यांनी आयसीसीचे अध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर बीसीसीआयमधील त्यांची जागा रिक्त झाली होती. त्या जागी सध्या देवजीत सैकिया यांनी अंतरिम सचिव म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या ते सहसचिव म्हणून काम पाहत होते. पण, नवीन निवडणुका होईपर्यंत आता ते सचिव पदाची जबाबदारी सांभाळतील. बीसीसीआयच्या नियमांनुसार, कार्यकारिणीतील एखादं पद रिक्त झाल्यानंतर ४५ दिवसांत त्या जागी नवीन नियुक्ती होणं बंधनकारक आहे आणि ही नियुक्ती निवडणुकीच्या मार्गाने व्हावी असाही संकेत आहे. (BCCI Secretary)
पण, जय शाह आयसीसीमध्ये जाणार हे निश्चित झाल्यावर बीसीसीआयने नवीन नियुक्तीपूर्वी जुळवाजुळव सुरू केली होती. सचिव पदाची मुदत सप्टेंबर २०२५ पर्यंत आहे. त्यामुळे बीसीसीआय सध्या एका वर्षासाठीच सचिवाची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. पण, त्यानंतर पुढच्या वर्षी अख्खी कार्यकारिणीच बदलली जाईल. तोपर्यंत सैकिया सचिव म्हणून काम करतील, अशी लक्षणं सध्या दिसत आहेत. (BCCI Secretary)
(हेही वाचा – ईव्हीएमवर शंका असल्यास खासदारांनी राजीनामा द्यावा; Navneet Rana यांचा विरोधकांवर निशाणा)
Former India coach Ravi Shastri discusses the impact @JayShah had on India cricket and why he will succeed as ICC Chair. pic.twitter.com/V8mZaHGaVS
— ICC (@ICC) December 8, 2024
दरम्यान, गेल्या रविवारी जय शाह यांनी बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून कार्यभार हाती घेतला आहे. ते आयसीसीच्या दुबईतील कार्यालयात रुजू झाले आहेत. त्यांच्या अध्यक्षपदासाठी माजी भारतीय कर्णधार आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी शाह यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रवी शास्त्री सध्या आयसीसीबरोबर आयसीसी रिव्ह्यू नावाचा कार्यक्रम करत आहेत. (BCCI Secretary)
‘शाह हे क्रिकेट आणि क्रिकेटपटूंच्या भल्याचा विचार करणारे अध्यक्ष आहेत. पुरुषांच्या क्रिकेटबरोबरच महिलांचं क्रिकेटही ते पुढे घेऊन जातील. तसंच त्यांच्या कार्यकालात क्रिकेटचा प्रसार बाहेरच्या देशातही होईल,’ अशी आशा रवी शास्त्री यांनी बोलून दाखवली आहे. क्रिकेटचा समावेश सध्या २०२८ च्या लॉस एंजलीस ऑलिम्पिकमध्ये झाला आहे. त्यासाठी ऑलिम्पिक समितीची ब्रिस्बेनमध्ये एक बैठक होणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष म्हणून शाह या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. (BCCI Secretary)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community