एकीकडे धरमशाला येथे झालेल्या अंतिम कसोटीत भारताने इंग्लंडवर मोठा विजय मिळविला. तर दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी एक नवीन योजना जाहीर केली. ही योजना २०२३ – २४ च्या हंगामात वरिष्ठ पुरुष संघासाठी लागू केली जाईल. तसेच या योजनेमुळे खेळाडूंना कसोटी सामने खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
(हेही वाचा – Sunil Gavaskar on Sarfraz Dismissal : गावसकर यांनी सर्फराझला दिला सर डॉन ब्रॅडमन यांनी दिलेला सल्ला)
ट्विट करून या योजनेची माहिती :
बीसीसीआयच्या (BCCI) सचिवांनी म्हणजेच जय शाह यांनी त्यांच्या एक्स या अधिकृत खात्यावर ट्विट करून या योजनेची माहिती दिली. त्यांनी या योजनेला “आपल्या सन्माननीय खेळाडूंना आर्थिक वाढ आणि स्थिरता प्रदान करण्याच्या उद्देशाने उचललेले एक पाऊल” असे संबोधले.
जय शाह पुढे म्हणाले,
“सीनियर टीमसाठी ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ सुरू केल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे, जे आमच्या प्रतिष्ठित खेळाडूंना आर्थिक वाढ आणि स्थिरता प्रदान करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आहे. २०२२-२३ हंगामापासून सुरू होणारी, ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ ही कसोटी सामन्यांसाठी दिल्या जाणाऱ्या १५ लाखांच्या मॅच फी व्यतिरिक्त असणआर आहे,” असे जय शाह (BCCI) यांनी द्विट केले.
I am pleased to announce the initiation of the ‘Test Cricket Incentive Scheme’ for Senior Men, a step aimed at providing financial growth and stability to our esteemed athletes. Commencing from the 2022-23 season, the ‘Test Cricket Incentive Scheme’ will serve as an additional… pic.twitter.com/Rf86sAnmuk
— Jay Shah (@JayShah) March 9, 2024
(हेही वाचा – Urmila Matondkar : उत्तर मुंबई काँग्रेसच्या वाट्याला; उर्मिला मातोंडकर यांचे काय होणार?)
काय आहे ‘कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना’ ?
वर्षाला ९ कसोटी सामने गृहीत धरल्यास, जे खेळाडू ५० टक्क्यांपेक्षा कमी सामने खेळतील त्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळणार नाही. जे खेळाडू ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच ५ ते ६ कसोटी सामने खेळतील त्यांना प्रती सामना ३० लाख इन्सेंटीव्ह मिळेल, ज्यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नसेल पण ते उपलब्ध असतील त्यांना प्रती सामना १५ लाख मिळतील. हिच टक्केवारी ७५ टक्क्यांच्या वर झाल्यास प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूला ४५ लाख मिळतील. (BCCI)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community