लवकरच टीम इंडिया दिसणार नव्या जर्सीत! पहा व्हिडिओ

लवकरच टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होणार आहे. या आगामी टी-20 चषकापूर्वीच भारतीय संघाला नवी जर्सी मिळणार आहे. बीसीसीआयचे (BCCI) अधिकृत प्रायोजक असलेल्या एमपीएल स्पोर्ट्स या कंपनीने एक व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्या दिसत आहेत. तर यामध्ये हार्दिक पांड्या चाहत्यांना टीम इंडियाच्या नवीन जर्सीचा भाग होण्यास सांगत आहे.

हा व्हिडिओ समोर येताच चाहत्यांनी नवीन जर्सीसाठी वेगवेगळे सल्ले देण्यास सुरुवात केली आहे. कुणी जुन्या स्काय ब्लू जर्सीची मागणी करत आहे. तर कुणी म्हणत आहे यावेळी तीच जर्सी असेल जी 2007 मध्ये पहिल्या T-20 वर्ल्ड कपमध्ये होती.

सुपर-12 चे सामने 22 ऑक्टोबरपासून सुरु होतील

22 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या सामन्याने टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर होणार आहे. मात्र, त्याआधी 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान पात्रता सामने खेळवले जातील. भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here