-
ऋजुता लुकतुके
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर देवाजीत साकिया यांनी त्यांची सचिव पदाची जागा बिनविरोध घेतली आहे. पण, त्यामुळे साकिया यांची संयुक्त सचिव पदाची जागा रिक्त झाली आहे. आणि ती भरण्यासाठी येत्या १ मार्चला बीसीसीआयने विशेष सर्वसाधारण सभा बोलावली आहे. या सभेचा हा एकमेव अजेंडा आहे. तशी नोटीसच राज्य संघटनांना जारी करण्यात आली आहे. (BCCI Special SGM)
(हेही वाचा- दिल्लीच्या निकालावर Chitra Wagh यांच्याकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक; ट्विट करत म्हणाल्या …)
‘येत्या १ मार्च रोजी बीसीसीआयचं मुख्यालय मुंबई इथं दुपारी १२ वाजता विशेष सर्वसाधारण सभेचं आयोजन करण्यात येत आहे. नवीन संयुक्त सचिवांची नियुक्ती आणि त्यासाठी निवड प्रक्रिया निश्चित करण्यासाठी सभेचं आयोजन करण्यात येत आहे,’ असं या पत्रकात म्हटलं आहे. अशाप्रकारची विशेष सभा बोलावण्यासाठी २१ दिवसांची मुदत कार्यकारिणीला द्यावी लागते. त्यामुळेच १ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. (BCCI Special SGM)
संयुक्त सचिव पदासाठी पूर्व विभागातून अविषेक दालमिया, उत्तर विभागातून रोहन जेटली आणि पश्चिम विभागातून संजय नाईक उत्सुक आहेत. पण, नियुक्तीसाठी निवडणूक होण्याची शक्यता खूपच कमी आहे. त्यामुळे विशेष सभेत सर्वानुमतीने निर्णय घेतला जाईल अशीच शक्यता आहे. यापूर्वी १२ जानेवारीला झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत देवाजीत सैकिया यांची सचिव म्हणून तर प्रभतेज सिंग भाटिया यांची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर दोन महिन्यांच्या आत बीसीसीआयची ही दुसरी विशेष सभा होत आहे. (BCCI Special SGM)
(हेही वाचा- Aam Aadmi Party चा मुख्य ‘आदमी’चं पराभूत; भाजपाची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल)
संयुक्त सचिव हा बीसीसीआयच्या दैनंदिन कारभारावर लक्ष ठेवून असतो. आणि कार्यकारिणी आणि कर्मचारी व विविध विभाग यांच्यातील समन्वयाचं काम करतो. प्रशासकीय कारभारावरही संयुक्त सचिवाचंच लक्ष असतं. (BCCI Special SGM)
हेही पहा-