BCCI Test Fees : कसोटी क्रिकेटचा मोबदला आयपीएल एवढा करण्याचा बीसीसीआयचा विचार

BCCI Test Fees : क्रिकेटपटूंचा कसोटीतील रस टिकून रहावा हा या विचारामागचा हेतू आहे 

145
BCCI Test Fees : कसोटी क्रिकेटचा मोबदला आयपीएल एवढा करण्याचा बीसीसीआयचा विचार
BCCI Test Fees : कसोटी क्रिकेटचा मोबदला आयपीएल एवढा करण्याचा बीसीसीआयचा विचार

ऋजुता लुकतुके

क्रिकेटपटूंचं कसोटी (BCCI Test Fees) क्रिकेटकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी बीसीसीआय (BCCI) कसोटीसाठीचं सामन्याचं शुल्क किंवा खेळाडूंना मिळणारा भत्ता वाढवण्याच्या तयारीत आहे. त्याप्रमाणे मध्यवर्ती करार केलेल्या खेळाडूंच्या वार्षिक कराराची रक्कम वाढवण्यावरही भर देण्यात येणार आहे. इथंही कसोटीला प्राधान्य मिळेल असाच बीसीसीआयचा दृष्टिकोण असेल. (BCCI Test Fees)

यासाठी बीसीसीआय (BCCI) मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid), निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) आणि संघ प्रशासनाशी चर्चा करत आहे. कसोटी क्रिकेटसाठीचा (BCCI Test Fees) मोबदला हा आयपीएलमधील (IPL) मध्यम श्रेणीच्या करारां इतका असावा असा बीसीसीआयचा (BCCI) विचार आहे. आंतरराष्ट्रीय कसोटींबरोबरच रणजी किंवा प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचा मोबदलाही त्या प्रमाणात वाढवण्यात येणार आहे. (BCCI Test Fees)

(हेही वाचा- Ravindra Jadeja : रांचीत रवींद्र जडेजाने दिली महेंद्रसिंग धोनीला भेट )

रणजी स्पर्धेतील (Ranji season) क्रिकेटचा (BCCI Test Fees) स्तर वाढावा यासाठीच बीसीसीआयचा (BCCI) हा प्रयत्न आहे. कारण, रणजी स्पर्धेचा (Ranji season) स्तर गेल्या काही वर्षांत खालावत चालल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. आणि आयपीएलचे (IPL) लिलाव झाले की, खेळाडूंचा रणजीतला उत्साह कमी होतो, असा बीसीसीआयचा(BCCI) अंदाज आहे. त्यामुळे रणजी सामन्यांकडे खेळाडूंचा ओढा कायम रहावा यासाठी बीसीसीआयकडून (BCCI) काही उपाययोजना केली जात आहे. सामने खेळणं सक्तीचं करणं हा एक उपाय. आणि दुसरा उपाय म्हणून मोबदला वाढवण्याचा विचार होत आहे. (BCCI Test Fees)

‘कसोटी तसंच प्रथमश्रेणी क्रिकेट खेळून क्रिकेटपटूला (BCCI Test Fees) वर्षाला ७५ लाख रुपये मिळाले पाहिजेत. इतकीच रक्कम साधारणपणे आयपीएलमध्ये (IPL) मिळते. असं झालं तर रणजीचा संबंध हंगाम (Ranji season) खेळण्याची इच्छा खेळाडूंमध्ये निर्माण होईल. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी हीच रक्कम १५ कोटी रुपये इतकी असावी, असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे,’ असं बीसीसीआयमधील (BCCI) सूत्रांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. (BCCI Test Fees)

(हेही वाचा- Cricket in Asian Games? आशियाई खेळांत क्रिकेटच्या समावेशासाठी आशियाई ऑलिम्पिक परिषद उत्सुक )

आता मिळणारी रक्कम पाहिली तर रणजी हंगामात (Ranji season) १० सामने खेळणाऱ्या खेळाडूला २५ लाख रुपये मिळतात. उलट आयपीएलमध्ये (IPL) आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या खेळाडूची बोलीच २० लाखांपासून सुरू होते. ही तफावत कमी करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न असेल.  (BCCI Test Fees)

निवड समितीची भूमिकाही राखीव खेळाडूंचा ताफा तयार करण्याची आहे. खासकरून तेज गोलंदाज लवकरात लवकर तयार व्हावेत असा निवड समितीचा विचार आहे. त्यामुळे यंदाच्या करारात अशा ५ राखीव तेज गोलंदाजांना करारपत्र देण्यात आलं आहे. ते येणाऱ्या काळात घडावेत असा निवड समिती, प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा विचार आहे. (BCCI Test Fees)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.