BCCI To Review New Zealand Series : न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवाचं बीसीसीआयकडून पोस्टमोर्टेम

BCCI To Review New Zealand Series : खेळपट्ट्या, खेळाडू आणि प्रशिक्षकांची कामगिरी यांचा आढावा घेतला जाणार आहे.

103
BCCI To Review New Zealand Series : न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवाचं बीसीसीआयकडून पोस्टमोर्टेम
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाला न्यूझीलंडकडून मायदेशातच व्हाईटवॉश पत्करावा लागला. हा पराभव नक्कीच जिव्हारी लागणारा आहे. आणि त्याची बीसीसीआयनेही दखल घेतली आहे. एकीकडे प्रशिक्षक गौतम गंभीरसाठी ऑस्ट्रेलियाचं आव्हान समोर उभं आहे. दुसरीकडे बीसीसीआय या पराभवाची चौकशी करणार आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतीय संघाचा पराभव हा तीन दिवसांच्या आत झाला आहे आणि ही चिंताजनक गोष्ट आहे. (BCCI To Review New Zealand Series)

राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षक असताना त्यांनी देशांतर्गत खेळपट्ट्या अधिकाधिक खेळकर असतील असं पाहिलं. आणि त्यामुळे अगदी इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतही खेळपट्ट्या तेज गोलंदाजांनाही पहिल्या दिवशी मदत करत होत्या. कसोटी सामनेही किमान चौथ्या दिवसापर्यंत चालत होते. पण, आताच्या संघ प्रशासनाने खेळपट्टी फिरकीला पोषक बनवण्याची विनंती राज्य क्रिकेट असोसिएशनला केली. तशा खेळपट्ट्यांवर मात्र संघाचा सपशेल पराभव झाला. त्यामुळे नेमक्या खेळपट्ट्या कशा हव्यात आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या बनवताना संघ प्रशासनानं क्युरेटरशी चर्चा करावी का, हा आता बीसीसीआयसमोरचा प्रश्न आहे. (BCCI To Review New Zealand Series)

(हेही वाचा – Samajwadi Party इंडी आघाडीमधून बाहेर पडणार?)

याआधीचे गोलंदाजीचे प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला साथ देणारी नसावी असं मत वेळोवेळी मांडलं होतं. एका वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले होते की, ‘खेळपट्ट्या पहिल्या दिवशीपासून चेंडू वळतील अशा नसाव्यात. त्याने संघाचं नुकसानच जास्त होतं. फिरकीपटू जर तितके चांगले असतील आणि प्रतिस्पर्धी संघापेक्षा वरचढ असतील तर एकवेळ ठिक. पण, रंगतदार कसोटी हवी असेल आणि दोन्ही संघांना समान संधी हवी असेल तर खेळपट्टी निदान पहिल्या दिवशी तेज गोलंदाजांना साथ देणारी हवी. कारण, फिरकी खेळपट्टी ही लॉटरी आहे. प्रतिस्पर्धी संघाकडे एक जरी गोलंदाज चांगला निघाला तरी त्यांना संधी मिळते.’ आता हेच तत्त्वज्ञान पुन्हा चर्चेला आलं आहे. गौतम गंभीर आणि त्याच्या चमूला संगासाठीची पुढील दिशा कोणती, असा प्रश्न आता विचारला जाईल. (BCCI To Review New Zealand Series)

आता बीसीसीआय रोहीत शर्मा, गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्याशी सखोल चर्चा करणार आहे. गौतम गंभीर यांनी निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहू नये, असं बीसीसीआयमधील अनेकांचं मत आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दौऱ्याच्या निवडीसाठी गंभीर बैठकीला हजर होता. आता तसा पायंडा भारतीय क्रिकेटमध्ये पडू नये असं लोकांचं मत आहे. राहुल द्रविड काही तुरळक अपवाद सोडले तर निवड समितीच्या बैठकांना उपस्थित नव्हते. त्यामुळे गंभीर यांची नेमकी जबाबदारी आणि त्यांचे सहाय्यक प्रशिक्षक यांची भूमिका यावर त्याच्याशी नक्की चर्चा होणार आहे. तर ज्येष्ठ खेळाडूंची संघातील जबाबदारी हा बीसीसीआयसमोरचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असेल. रोहीत, विराट, अश्विन आणि जाडेजा यांनी वयाची पचतिशी पार केली आहे. त्यांची निवृत्तीची योजना तयार करणं आणि खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटचा पुरेसा सराव मिळावा यासाठीची योजना तयार करण्यावर बीसीसीआयचा भर असणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वीच याची आखणी होऊ शकते. (BCCI To Review New Zealand Series)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.