२०० धावा केल्यानंतरही संघाबाहेर का ठेवले? रोहितच्या प्रश्नावर ईशान किशनचे भन्नाट उत्तर…

111

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेला सुरुवात झाली आहे. पहिल्या वनडे सामन्यात भारताचा १२ धावांनी विजय झाला आहे. शुभमन गिलच्या द्विशतकामुळे भारताने ३४९ धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात शुभमनने अनेक विक्रम केले. यानंतर BCCI ने द्विशतक करणाऱ्या तीन स्टार खेळाडूंचा व्हिडिओ जारी केला. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा, ईशान किशन आणि शुभमन गिलचा समावेश आहे. या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला.

( हेही वाचा : महानगर गॅस कंपनीने रिक्षा चालकांसाठी आयोजित केले मोफत नेत्र तपासणी शिबिर)

ईशान किशनचे भन्नाट उत्तर 

या मुलाखती दरम्यान रोहितने शर्माने ईशान किशनला महत्त्वाचा प्रश्न विचारला. त्याने ईशानला विचारले, द्विशतक केल्यानंतरही तुला संघाबाहेर का ठेवले गेले? यावर ईशानने सुद्धा रोहितला भन्नाट उत्तर दिले, रोहित भाई आप ही कर्णधार थे! असे तो म्हणाला. खरंतर ईशानचा संघात समावेश न केल्यामुळे सोशल मीडियावर सुद्धा जोरदार चर्चा रंगली होती. ईशानचे उत्तर ऐकून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांना सुद्धा हसू आवरले नाही.

यावेळी शुभमन गिल म्हणाला मी खूप खूश आहे. या सामन्यात मला मोठी खेळी करण्याची संधी होती अगदी त्याप्रमाणेच मी खेळलो. BCCI ने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. क्रिकेटप्रेमींकडूनही या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.