टीम इंडियाने ऋषभ पंतसाठी शेअर केला खास व्हिडिओ! प्रशिक्षक द्रविडसह काय म्हणाला नवा कर्णधार पंड्या?

भारताचा स्टार खेळाडू आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतचा अपघात झाल्याने सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. ऋषभ पंत पूर्णपणे बरा होईपर्यंत टीम इंडियासोबत खेळू शकणार नाही. यामुळेच पंत लवकर बरा होण्यासाठी त्याला संपूर्ण जगभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. प्रशिक्षक राहुल द्रविडसह टीम इंडियातील सर्व खेळाडूंनी एक व्हिडिओ बनवत पंतला ‘तू फायटर आहेस, लवकर बरा हो’ असा संदेश दिला आहे.

ऋषभ पंतचा शुक्रवारी पहाटे रुरकी येथे अपघात झाला होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंतच्या गुडघ्याला फ्रॅक्चर झाले आहे तसेच पाठीला सुद्धा दुखापत झाली आहे. या अपघातानंतर त्याला बराच वेळ क्रिकेटपासून दूर रहावे लागू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंतला पूर्ण बरा होण्यासाठी किमान ६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ऋषभ पंत लवकर बरा व्हावा यासाठी टीम इंडियाने खास व्हिडिओ बनवला आहे.

ऋषभ आशा आहे तू बरा आहेस गेल्या वर्षभरात आपण एकत्र काम केले. या दरम्यान तू अनेक संस्मरणीय सामने खेळले आहेत. कठीण काळातून बाहेर कसे यायचे हे तुला माहिती आहे असे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड या व्हिडिओ माध्यमातून म्हणाला आहे. हार्दिक पंड्या म्हणतोय की, ऋषभ तू लवकर बरा हो अशी माझी इच्छा आहे. मला माहिती आहे तू फायटर आहेस. तर युझवेंद्र चहल या व्हिडिओमध्ये सांगतोय लवकर बरा होऊन ये ..म्हणजे आपण चौकार-षटकार मारूया. तुझ्यासोबत टीम आणि संपूर्ण देश आहे अशा शुभेच्छा संपूर्ण भारतीय संघाने व्हिडिओद्वारे ऋषभ पंतला दिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here