BCCI घेणार कठोर निर्णय! रोहितला धक्का? टी२० संघाचा नवा कर्णधार ठरणार…

196

टी-२० विश्वचषकात भारताचा पराभव झाल्यानंतर BCCI सतर्क झाली आहे. इंग्लंडने १० गडी राखून भारताचा पराभव केल्यामुळे टीम इंडियाला रिकाम्या हाती परतावे लागले. गेल्या ९ वर्षात भारताला एकही ICC जेतेपद पटकावता आलेले नाही. २००७ ते २०१३ या कालावधीत भारताने ICC च्या तीन स्पर्धा जिंकल्या होत्या.

( हेही वाचा : बेस्टच्या डबल डेकर आणि प्रिमियम बस सेवेची मुंबईकरांना प्रतीक्षा…)

अनुभवी खेळाडूंना वगळण्यात येणार

BCCI चा पुढचा विश्वचषक २०२४ मध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी BCCI कडून नवा कर्णधार निवडला जाणार आहे. संघात अनेक युवा खेळाडूंना सुद्धा संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे २०२४ च्या टी २० विश्वचषक स्पर्धेत अनुभवी खेळाडूंना वगळण्यात येण्याची शक्यता आहे. रोहित शर्मा, राहुल द्रविड, विराट कोहलीला यासाठी बैठकीसाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. टी२० साठी या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

टी२० संघाचे नेतृत्व हार्दीक पंड्याकडे सोपवले जाण्याची शक्यता आहे. IPL मध्ये गुजरात टायटन्सचे नेतृत्व करताना त्याने पहिल्याच प्रयत्नात संघाला जेतेपद मिळवून दिले होते आणि त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याच्याकडे टी२० चे कर्णधारपद दिले जाण्याची शक्यता आहे. BCCI कोणालाही निवृत्ती घ्या म्हणून सांगत नाही परंतु पुढच्या वर्षी बरेच खेळाडू टी २० खेळताना दिसणार नाहीत असे सूचक विधान करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.