BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! रोहित नाही, आता ‘या’ खेळाडूला करा कर्णधार; माजी क्रिकेटपटूचे स्पष्ट मत

टी-२० विश्वचषकात टीम इंडियाटा लाजिरवाणा पराभव झाल्यावर आता BCCI कडून भारतीय संघात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने भारताच्या सेमीफायनलमधील पराभवावनंतर गंभीर विचार करण्यास सुरूवात केली आहे. ICC च्या स्पर्धेत विजेतेपद मिळवता आले नाही, यामुळेच BCCI टी२० साठी आणि वनडेसाठी दोन वेगवेगळ्या कर्णधारांचा विचार करत आहे. हा बदल जानेवारीपासून होणाऱ्या श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेपासून लागू होऊ शकतो.

( हेही वाचा : फक्त २० रुपयात २ लाखांचा विमा; सरकारच्या या योजनेतून तुम्हाला होईल मोठा फायदा! )

रोहित शर्माचा वर्कलोड कमी करण्यासाठी निर्णय 

भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्यांसाठी वनडे आणि टी२० साठी दोन वेगवेगळे कर्णधार असणार आहे. अशा स्थितीत रोहित शर्मा वनडे संघाचे तर हार्दिक पंड्या टी२० संघाचे नेतृत्व करू शकतो. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यात प्रत्येकी ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका होणार आहे. रोहित शर्माचा वर्कलोड कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेत BCCI सुद्धा मुख्य कोच राहूल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्यासोबत एक बैठक घेणार आहे. या सर्वांची बाजू ऐकल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल आणि टी२० संघासाठीची रणनिती ठरवली जाईल असे सांगण्यात आले आहे.

संघात बदल करण्याची वेळ 

तसेत भारताचे माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांनी सुद्धा संघात बदल करण्याची वेळ आली आहे असे स्पष्ट केले आहे. नव्या कर्णधाराला किमान १ ते २ वर्षे द्यायला हवीत त्यामुळे आता संघ बांधणीला सुरूवात केली तरच पुढच्या विश्वचषकासाठी चांगला संघ बांधला जाऊ शकतो यासाठी हार्दिक पंड्याला संधी द्यावी असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here