टी-२० विश्वचषकानंतर आता भारतीय संघाला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्या बाबतीत BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राहुल द्रविडकडून सुद्धा टी२० संघाचे मुख्य प्रशिक्षकपद काढून घेतले जाणार आहे. जानेवारीत टी२० संघासाठीच्या नव्या कोचिंग स्टाफची घोषणा करण्यात येणार आहे.
टी२० साठी नवा प्रशिक्षक
श्रीलंकेविरुद्ध भारतीय संघ नवे प्रशिक्षक व नवा कर्णधार अशा नव्या रुपात खेळण्यासाठी उतरणार आहे. हार्दिक पंड्याकडे टी२०चे नेतृत्व सोपवले जाणार आहे. आता BCCI च्या अधिकाऱ्यांनी यासंदर्भात Insidesport ला माहिती दिली आहे. राहुल द्रविडकडे वन डे व कसोटी संघाची जबाबदारी कायम राहिल, परंतु टी२० साठी नवा प्रशिक्षक नेमण्यात येणार आहे.
BCCI ने स्पष्टच सांगतिले
२०२३ चा वन डे वर्ल्डकप आणि २०२४ च्या टी २० वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर BCCI ने आतापासूनच सर्व तयारी सुरू केली आहे. रोहित, विराटसह, मोहम्मद शमी, आर आश्विन, दिनेश कार्तिक यांचा यापुढे टी२० संघात समावेश केला जाणार नाही असे BCCI ने स्पष्ट सांगतिले आहे.
Join Our WhatsApp Community