- ऋजुता लुकतुके
मुंबईत रविवारी झालेल्या विशेष सभेत बीसीसीयचे सचिव म्हणून देवाजित साकिया आणि खजिनदार म्हणून प्रभतेज सिंग भाटिया यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जय शाह यांची आयसीसीचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे तसंच आशीष शेलार राज्य मंत्रिमंडळात सहभागी झाल्यामुळे त्यांच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. साकिया हे आसाम क्रिकेट मंडळाचं तर प्रभतेज चंदिगड क्रिकेट मंडळाचं प्रतिनिधित्व करतात. (BCCI Working Committee)
(हेही वाचा- Maha Kumbh Mela 2025 : तीर्थराज प्रयागला येऊन मनुष्यजीवनाचे सार्थक करा; महंत अनिकेतशास्त्री यांचे आवाहन)
सचिव आणि खजिनदार या पदांसाठी या दोघांनीच अर्ज केले असल्यामुळे ही निवड बिनविरोध झाली आहे. साकिया यांच्या नियुक्तीनंतर आसाम क्रिकेट मंडळाने एक ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं आहे. या मंडळातून बीसीसीआयच्या कार्यकारिणीपर्यंत पोहोचलेले ते पहिले क्रिकेट प्रशासक आहेत. (BCCI Working Committee)
Assam Cricket Association (ACA) takes immense pride in celebrating a historic moment for Assam as Mr. Devajit Saikia has been elected as the Secretary of the Board of Control for Cricket in India (BCCI).
1/4 pic.twitter.com/GqBz104GHH
— Assam Cricket Association (@assamcric) January 12, 2025
जय शाह १ डिसेंबरपासून आयसीसीच्या अध्यक्षपदी विराजमान झाले होते. तेव्हापासूनच देवाजित साकिया यांनी सचिव म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला होता. त्यापूर्वी ते संयुक्त सचिव होते. त्यामुळे त्यांची सचिव पदी वर्णी अगदी निश्चित समजली जात होती. आता त्यांचं संयुक्त सचिव हे पद रिक्त झालं आहे. (BCCI Working Committee)
(हेही वाचा- Ind vs Eng, T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतून पंत, जयसवाल यांना वगळल्यामुळे टीका )
‘कार्यकारिणीतील सचिव आणि खजिनदार या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आला. त्यामुळे निवडणुकीची गरज भासली नाही. अर्जदार दोन्ही उमेदवारांची नियुक्ती जाहीर करत आहोत,’ असं या निवडणुकीचे निरीक्षक एके ज्योती यांनी जाहीर केलं. बीसीसीआयच्या या विशेष सभेत आयसीसीचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून जय शाह यांचा शनिवारी छेटोखानी सत्कारही करण्यात आला. (BCCI Working Committee)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community