ऋजुता लुकतुके
इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स सामन्यात अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) या स्पर्धेतील पहिली मोठी खेळी आणि ती ही शतकी उभारली. आणि त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०,००० धावांचा टप्पाही ओलांडला. विशेष म्हणजे इंग्लंडकडून १०,००० धावा आणि १०० बळी अशी अष्टपैलू कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
पुण्यात नेदरलँड्स विरुद्ध त्याने ८२ चेंडूंत १०८ धावांची खेळी रचली. यात ६ षटकार आणि ६ चौकार होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आता त्याच्या नावावर १०,०८१ धावा जमा झाल्या आहेत. आणि त्याचबरोबर १०० बळीही त्याच्या नावावर आहेत.
अशी कामगिरी करणाऱ्या सचिन तेंडुलकर, तिलकरत्ने दिलशान, सनथ जयसूर्या, सौरव गांगुली आणि जॅक कॅलिस या दिग्गज खेळाडूंच्या पंक्तीत आता स्टोक्स जाऊन बसला आहे. २०११ मध्ये स्टोक्सला पहिल्यांदा इंग्लिश संघात संधी मिळाली. आणि त्यानंतर ११३ एकदिवसीय सामने खेळताना त्याने ३,३७९ धावा केल्या आहेत. तर ७४ बळीही मिळवले आहेत. २०१९ चा विश्वचषक त्याच्यासाठी सगळ्यात यशस्वी होता. आणि त्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे इंग्लंडला तो जिंकता आला.
(हेही वाचा- Pune Crime : पुणे शहरात थरार, सराफावर गोळ्या झाडून दागिने लुटले)
कसोटी संघात बेन स्टोक्सचा समावेश झाला तो २०१३ मध्ये. आणि तो आतापर्यंत ९७ कसोटी सामने खेळला आहे. यात त्याने ६,११७ धावा तसंच १९७ बळी मिळवले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर १३ शतकं आहेत. एकदिवसीय क्रिकेटमधील त्याचं हे पाचवं शतक होतं.
बुधवारी नेदरलँड्स विरुद्ध खेळताना स्टोक्सने मोक्याच्या क्षणी शतक झळकावताना संघाची पडधड रोखली. आणि ३३९ धावांचा टप्पाही गाठून दिला. विश्वचषक स्पर्धेतील बेन स्टोक्सचं हे पहिलंच शतक होतं.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community