-
ऋजुता लुकतुके
रविवारी इंग्लिश संघाचा सामना भारताशी होणार आहे. या सामन्याआधी संघातील महत्त्वाचे फलंदाज बेन स्टोक्स आणि लिअम लिव्हिंगस्टोन यांना दिल्लीत रिक्षावारीचा एक भयानक अनुभव आला. ऐकूया त्यांच्याच शब्दात. (Ind vs Eng)
इंग्लिश अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स मैदानावर फारसा फॉर्मात नाहीए आणि आता त्याला नवी दिल्लीत गर्दीच्या रस्त्यावरही एका भयानक प्रसंगाला सामोरं जावं लागल्याचं त्याने म्हटलं आहे. संघातील साथीदार लिअम लिव्हिंगस्टोनसह स्टोक्स नवी दिल्लीत रिक्षा सफरीवर निघाला होता. (Ind vs Eng)
पण, आधीत रहदारी असलेल्या रस्त्यावर एका कारशी त्यांच्या रिक्षेची टक्कर होता होता राहिली. या प्रसंगाचं वर्णन बेन स्टोक्सने इन्स्टाग्राम अकाऊंटवर केलं आहे. (Ind vs Eng)
View this post on Instagram
काय झालं याचं वर्णन करता करता स्टोक्सने आपल्या मोबाईलवर त्या प्रसंगाचं चित्रण दाखवायलाही सुरुवात केली आहे. रिक्षा खूपच वेगाने जाताना इथं दिसते आहे आणि अचानक समोर एक वेगवान एसयुव्ही आली. दोन्ही एकाच दिशेनं जात असल्यामुळे आणि एसयुव्हीही वेगात असल्याने टक्कर टळली. (Ind vs Eng)
(हेही वाचा – Bhau Torsekar : सोशल मीडियामुळे खरे टॅलेंट समोर येत आहे – भाऊ तोरसेकर)
आपल्या इंडिया डायरीज् या सदरात स्टोक्सने हा व्हीडिओ शेअर केला आहे. १५ ऑक्टोबरला इंग्लिश संघाचा अफगाणिस्तानबरोबरचा सामना नवी दिल्लीत अरुण जेटली स्टेडिअमवर झाला होता आणि या सामन्यात संघाला धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर लंकन संघाकडूनही झालेल्या पराभवामुळे इंग्लंडची जबरदस्त पिछेहाट झाली आहे. सध्या गुणतालिकेत २ गुणांसह ते नवव्या स्थानावर आहेत आणि उपांत्य फेरीत पोहोचण्याची आशा खूपच धुसर आहे. (Ind vs Eng)
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या मोठ्या पराभवामुळे संघाची धावांची सरासरीही खूपच कमी आहे. अशावेळी भारताबरोबरच्या सामन्यात मैदानावरील लौकिकाला साजेशी कामगिरी व्हावी हीच इंग्लिश संघाची इच्छा असणार आहे. नवी दिल्लीतील मुक्कामानंतर इंग्लिश संघ लखनौमध्ये दाखल झाला आहे आणि तिथेही संघाची दोन सराव सत्र पार पडली आहेत. भारत आणि इंग्लंड दरम्यानचा मुकाबला लखनौच्या एकाना स्टेडिअमवर रविवारी २९ ऑक्टोबरला दिवस-रात्र रंगणार आहे. (Ind vs Eng)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community