- ऋजुता लुकतुके
वुशू हा चिनी पारंपरिक मार्शल आर्ट्स खेळ आहे. पण, त्यातील हालचाली दिसायला चपळ आणि देखण्या दिसतात. आणि स्पर्धात्मक खेळ म्हणूनही या खेळाची लोकप्रियता जगभर वाढत आहे. कुंग फू, जिमनॅस्टिक्स आणि नृत्य अशा तिघांचा संगम असलेला असा हा खेळ आहे. त्यामुळे मार्शल आर्ट्सला अदाकारीचं रुप देणारा हा खेळ अशी त्याची ओळख बनली आहे. अचूकता, सौंदर्य, चपळता आणि अदाकारी हे गुण या खेळासाठी असावे लागतात. (Best Wushu Players in the World)
अशा या खेळातील जागतिक आणि भारतीय स्तरावरील गाजलेले खेळाडू बघूया. खेळाडूंचं कौशल्य, अनुभव आणि विविध स्पर्धांमधील कामगिरी यांचा निकष त्यासाठी गृहित धरला आहे. आशियाई खेळांमध्ये वुशू खेळाचा समावेश आधीपासून आहे. (Best Wushu Players in the World)
दारिया तारासोवा
रशियाची दारिया तारासोवा मागची १० वर्ष वुशू खेळात जागतिक स्तरावर चांगली कामगिरी करत आहे. जागतिक स्तरावर वुशू खेळात रशियाचं प्रतिनिधित्व करण्याबरोबरच तिने स्पर्धाही जिंकल्या आहेत. तिचं पदलालित्य आणि चपळता यामुळे ती मैदानावर उठून दिसते. २०१५ मध्ये तिने जागतिक स्तरावर सन्यास घेतला आणि आता तिने प्रशिक्षक होऊन नवीन खेळाडू घडवण्यावर भर दिला आहे. पण, वुशू खेळाच्या जागतिक स्तरावर फारशा प्रमाणात स्पर्धा होत नसताना २००३ ते २००९ हा काळ तिने गाजवला आहे. २०१२ मध्ये जागतिक वुशू संघटनेनं तिला या खेळाची पहिली जागतिक ब्रँड अँबेसिडर केलं होतं. (Best Wushu Players in the World)
(हेही वाचा – Ford Mustang Mach E : मस्टँग मॅक ई सह फोर्ड कंपनीची भारतात परतण्याची तयारी)
युआन वेनकिंग
हाँग काँगचा युआन वेंगकिंग गेली २० वर्षं वुशू खेळतोय. वुशूच्या चेंग्वेन प्रकारात तो खेळतो. आणि त्याची या प्रकारावरील पकड ही सर्वोत्तम मानली जाते. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय पदकंही मिळवली आहेत. आपला ॲक्रोबॅटिक खेळासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याचं लांब पल्ल्याची मजल मारता येणारं कौशल्य आणि तंत्र वादातीत आहे. (Best Wushu Players in the World)
जेट ली
चीनचा जेट ली तुम्ही चिनी सिनेमांचा हीरो म्हणूनही पाहिला असेल. पण, त्याचं वुशू खेळातील कौशल्यही तितकंच सर्वोच्च दर्जाचं आहे. १९७० आणि ८० च्या दशकात चीनमधील राष्ट्रीय वुशू स्पर्धा त्याने अक्षरश: गाजवल्या. त्याच्या कौशल्य आणि प्रसिद्धीमुळे वुशू खेळ जागतिक स्तरावर नावारुपाला आला असं मानलं जातं. त्याची सिनेमातील लोकप्रियताही त्यासाठी उपयोगी पडली. त्याला वुशू खेळातील कलाकारच मानलं जातं. (Best Wushu Players in the World)
(हेही वाचा – Isro : इस्त्रोच्या हवामान उपग्रहाचे १७ फेब्रुवारीला होणार प्रक्षेपण)
झाओ चँग जुन
वुशू खेळाची जागतिक अजिंक्यपद स्पर्धा १९९१ मध्ये सुरू झाली. आणि ती झाओनं जिंकली होती. आणि त्यानंतर १९९० च्या दशकात त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दबदबा निर्माण केला. चेंग्वेन आणि दाओशू या प्रकारातील कौशल्यासाठी तो ओळखला जातो. (Best Wushu Players in the World)
वू यनान
यु वुनान ही चीनमधील आघाडीच्या महिला वुशू खेळाडूंपैकी एक आहे. ती अजूनही खेळत आहे. आणि २०१७ तसंच २०१८ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने विजेतेपद पटकावलं आहे. (Best Wushu Players in the World)
अलीकडे भारतातही वुशू खेळ लोकप्रिय होतोय. आणि ऑलिम्पिक असोसिएशननेही या खेळाला मान्यता दिली आहे. भारतातही राष्ट्रीय स्पर्धा पार पडतात. आणि भारतीय खेळाडू जागतिक स्तरावरही खेळतात. प्रवीण कुमार, पूजा काडियन, सूर्या भानू प्रताप सिंग, रोशीबिना देवी आणि सजन लामा या खेळाडूंनी अलीकडेच चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली होती. (Best Wushu Players in the World)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community