Bhaichung Bhutia : भारतीय फुटबॉल असोसिएशन बरखास्त करण्याची मागणी बायचुंग भुतिया का करतोय?

भारतीय संघाच्या खराब कामगिरीसाठी खापर बायचुंगने असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना दोषी धरलं आहे.

84
Bhaichung Bhutia : भारतीय फुटबॉल असोसिएशन बरखास्त करण्याची मागणी बायचुंग भुतिया का करतोय?
Bhaichung Bhutia : भारतीय फुटबॉल असोसिएशन बरखास्त करण्याची मागणी बायचुंग भुतिया का करतोय?
  • ऋजुता लुकतुके

बायचुंग भुतिया (Bhaichung Bhutia) हा भारतीय फुटबॉलमधील एक नावाजलेलं नाव आहे. सध्या तो भारतीय फुटबॉल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांवर चिडलाय. असोसिएशनला खमकं नेतृत्व आणि दिशा नसल्यामुळेच भारतीय फुटबॉल संघाची कामगिरी घसरल्याचा गंभीर आरोप बायचुंगने केला आहे. इतकंच नाही, तर असोसिएशन बरखास्त करून नवीन निवडणुका घेण्याची मागणीही त्याने केली आहे. अलीकडेच भारतात इंटरकाँटिनेन्टल चषक ही तीन देशांची फुटबॉल स्पर्धा झाली. यात भारताला अगदी सीरियाकडूनही ०-३ ने पराभव स्वीकारावा लागला. तर मॉरिशस विरुद्ध गोलशून्य बरोबरीत समाधान मानावं लागलं.

हे निकाल म्हणजे फुटबॉल असोसिएशनकडे संघासाठी कुठलीही योजना नसल्याचंच द्योतक आहेत, असं बायचुंगला (Bhaichung Bhutia)  वाटतं. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्याने आपलं मन मोकळं केलं आहे. आणि देशात सध्या फुटबॉलची स्थिती अतिशय दारुण असल्याचं त्याने या मुलाखतीत म्हटलं आहे.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांच्या घरी आला खास पाहुणा; नामकरण सोहळाही झाला)

(हेही वाचा – Chhatrapati Sambhaji Nagar Accident : मद्यधुंद तरुणांच्या गाडीची धडक, बाळासह चौघांचा मृत्यू)

‘भारतीय फुटबॉलचं सध्याचं लक्षण काही चांगलं नाही. आधी आपण निदान पहिल्या शंभरात तरी होतो. आता १२५ पर्यंत खाली घसरलो आहोत. मला वाटतं, देशातील फुटबॉलला नवीन प्रशासक हवेत, त्यासाठी असोसिएशनमध्ये निवडणुका व्हायला हव्यात. आणि नवीन लोकांकडे कारभार सोपवायला हवा,’ असं बायचुंग म्हणाला. (Bhaichung Bhutia)

फिफा विश्वचषकाच्या पात्रता फेरीतही भारताला चांगला ड्रॉ मिळालेला असूनही तिसऱ्या फेरीत बाद व्हावं लागलं. त्यानंतर फुटबॉल प्रशिक्षक इगॉर स्टायमॅक (Igor Stimac) यांना डच्चू देण्यात आला. पण, चुका मूलभूत असून त्यावर तात्पुरता नाही तर कायमचा उपाय हवा, असं बायचुंगला (Bhaichung Bhutia) वाटतं. त्यामुळे या विषयाकडे सखोल आणि नव्याने बघणारा प्रशासक हवा, असं बायचुंगने वारंवार बोलून दाखवलं.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.