Bharat : भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवरही Bharat लिहा; वीरेंद्र सेहवागची बीसीसीआयकडे मागणी 

166

वनडे वर्ल्ड कपसाठी भारताचा संघ जाहीर करण्यात आला. त्यानंतर लागलीच भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने एक मोठी मागणी बीसीसीआयकडे केली आहे. सेहवागने बीसीसीआयला सांगितले की, वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची जी जर्सी असेल तिच्यावर INDIA असे न लिहिता BHARAT असे लिहा. भारताच्या जर्सीवर हा बदल का करायचा, याचे कारणही आता वीरेंद्र सेहवागने सांगितले आहे.

क्रिकेटमध्ये खेळाडूंना जी देशाची जर्सी दिली जाते, तिच्यावर छातीवर देशाचे नाव ठळकपणे लिहिलेले असते. आतापर्यंत भारताच्या जर्सीवर इंडिया असेच लिहिले होते. सेहवागही जेव्हा खेळत होता तेव्हा त्याच्या जर्सीवरही इंडिया असेच नाव लिहिलेले होते. पण आता पुढच्या महिन्यात होणाऱ्या विश्वचकात भारताची जी जर्सी असेल त्यावर इंडिया असे नाव न लिहिता भारत असे लिहावे, असे सेहवागने म्हटले आहे. बीसीसीआयने असे का करायला हवे, याचे कारणही सेहवागने सांगितले आहे.

याबाबत सेहवागने एक ट्विट केले आहे. त्यामध्ये सेहवागने म्हटले आहे की, ” माझा नेहमीच असा विश्वास आहे की आपल्यामध्ये अभिमान जागृत करणारे नाव असावे. आम्ही भारतीय आहोत, INDIA हे ब्रिटीशांनी दिलेले नाव आहे आणि आमचे मूळ नाव ‘भारत’ अधिकृतरीत्या परत मिळण्यास बराच काळ लोटला आहे. मी बीसीसीआय आणि जय शहा यांना विनंती करतो की, या विश्वचषकात आमच्या खेळाडूंच्या छातीवर ‘भारत’ असेल हे पाहावे.” आपल्या देशाचे नाव भारत आहे आणि त्यामुळे आता आपल्या वर्ल्ड कपच्या जर्सीवर इंडिया ऐवजी भारत हे नाव असावे, अशी विनंती सेहवागने बीसीसीआयला केली आहे. त्यामुळे आता बीसीसीआय याबाबत कोणते पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. वर्ल्ड कपला आता एजून एक महिना आहे. त्यामुळे भारताच्या वर्ल्ड कपच्या जर्सी अजून तयार झाल्या नसतील. त्यामुळे आता सेहवागच्या म्हणण्यानुसार टीम इंडियाच्या खेळाडूंच्या जर्सीवर भारत असे नाव असणार का, याची उत्सुकता सर्वांना असेल.

(हेही वाचा Maratha Reservation : जीआर नाही निघाला तर अन्न पाण्याचा त्याग करणार; मनोज जरांगे उपोषण सुरूच ठेवणार)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.