पॅरालिम्पिकमध्ये भारताची ‘चांदी’… भाविनाला मिळाले यश

87

ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर सर्वांचे लक्ष आता पॅरालिम्पिककडे लागले आहे. याच स्पर्धेत रविवारी भारतसाठी आनंदाची बातमी आली आहे. टेबल टेनिसपटू भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक आणत इतिहास रचला आहे. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना ही पहिली महिला ठरली आहे. 29 ऑगस्ट रोजी असलेल्या राष्ट्रीय क्रीडा दिनामित्ताने तिच्याकडून ही आगळीवेगळी भेट भारताला देण्यात आली आहे.

भाविनाला रौप्य पदक

भारताच्या भाविना पटेलने टोकियो पॅरालिम्पिक टेबल टेनिस क्लास 4 स्पर्धेत रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. टोकियो पॅरालिम्पिक मधले भारताचे हे पहिले पदक आहे. अंतिम फेरीत भाविनाचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगशी झाला. यिंगने जेतेपदाच्या लढतीत भाविनाचा 3-0 असा पराभव केला.

रचला इतिहास

टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी भाविना पहिली खेळाडू ठरली आहे. पराभव होऊनही भाविनाने आपल्या खेळाने करोडो मने जिंकली आहेत. भारताच्या भाविना पटेलने उपांत्य फेरीत चीनच्या मिआओ झांगचा 3-2 असा पराभव केला होता.

पदकांसोबतच ही कामगिरी

अहमदाबादच्या 34 वर्षीय पॅरालिम्पियन भाविनाने तिच्या पदवीच्या दिवसांमध्ये फिटनेस राखण्यासाठी टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली होती. भारतीय पॅडलरसाठी हे पुनरागमन फार महत्वाचे आहे कारण तिने केवळ पदकंच जिंकले नाही, तर रिओ 2016 सुवर्णपदक विजेता बोरिस्लावा पेरिक रॅन्कोविकसह तीन मजबूत विरोधकांना पराभूत केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.