- ऋजुता लुकतुके
भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) हा टी-२० क्रिकेटमधील सगळ्यात यशस्वी तेज गोलंदाज आहे. पण, त्याचाच एक विक्रम यंदा मोडला जाऊ शकतो आणि तो मोडणारा गोलंदाजही भारतीयच असेल. युवा टी-२० गोलंदाज अर्शदीप सिंग दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत भुवनेश्वर कुमारला मागे टाकू शकतो. दोन्ही बाजूंनी चेंडू वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज अशी ओळख अल्पावधीतच अर्शदीपने मिळवली आहे. आता आणखी ९ बळी मिळवले तर तो एका कॅलेंडर वर्षांत ३७ बळी मिळवून भुवनेश्वरच्या विक्रमाशी बरोबरी साधू शकतो.
सध्या अर्शदीपने १४ सामन्यांमध्ये षटकामागे ७.०४ धावा देत २८ बळी मिळवले आहेत. टी-२० विश्वचषकात अमेरिकेविरुद्धची ९ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. आता आफ्रिकेविरुद्धच्या ४ सामन्यांच्या मालिकेत अर्शदीपकडे या वर्षीचा सर्वात यशस्वी गोलंदाज होण्याची संधी चालून आली आहे. गेल्यावर्षीच तो या विक्रमाच्या जवळ पोहोचला होता. त्याने २०२२ मध्ये १८ च्या सरासरीने तेव्हा ३३ बळी मिळवले होते. म्हणजेच त्याला फक्त ४ बळी कमी पडले.
𝗣𝗿𝗲𝗽𝘀 𝗕𝗲𝗴𝗶𝗻! 👍👍#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/GQxM27g4lI
— BCCI (@BCCI) November 5, 2024
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : मुसलमानांचे एकगठ्ठा मतदान होण्यासाठी १८० संघटना कार्यरत)
भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी-२० मालिका ८ नोव्हेंबरला दरबान इथं सुरू होत आहे. या मालिकेत भारतीय संघ ५ टी-२० सामने खेळणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या मालिकेत उतरला आहे. तर संघाचे तात्पुरते प्रशिक्षक म्हणून व्ही व्ही एस लक्ष्मण यांची नियुक्ती झाली आहे. ते आणि त्यांचा क्रिकेट अकादमीतील सहाय्यक प्रशिक्षक वर्ग इथं संघाबरोबर आहे. तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतीय संघाबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी करत आहेत. (Bhuvneshwar Kumar)
भारतीय टी-२० संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, तिलक वर्मा, जितेश शर्मा, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजय कुमार व्यक्ष, आवेश खान व यश दयाल
दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा कार्यक्रम
८ नोव्हेंबर – पहिला टी-२० सामना (दरबान)
१० नोव्हेंबर – दुसरा टी-२० सामना (गेबेरा)
१३ नोव्हेंबर – तिसरा टी-२० सामना (सेंच्युरियन)
१५ नोव्हेंबर – चौथा टी-२० सामना (जोहानसबर्ग)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community