कोहलीच्या रुमचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेल प्रशासनाने मागितली माफी, केली मोठी कारवाई

138

सध्या टी-20 विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघ हा ऑस्ट्रेलियात आहे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणा-या विराट कोहलीची सध्या संपूर्ण देशभर चर्चा आहे. पण याच दरम्यान आता विराट कोहलीच्या हॉटेल रुममधील एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पर्थमधील हॉटेल प्रशासनाने माफी मागत हाॉटेल कॉन्ट्रॅक्टवर कठोर कारवाई करत त्याला निलंबित केले आहे.

कोहलीच्या हॉटेल रुमचा व्हिडिओ व्हायरल

एका चाहत्याने विराट कोहलीच्या हॉटेल रुममध्ये शिरत कोहलीच्या रुमचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे कोहलीने देखील संताप व्यक्त केला. आपल्याला हॉटेल रुममध्ये देखील प्रायव्हसी मिळत नसल्याचे सांगत कोहलीने नाराजी व्यक्त केली होती. कोहलीसोबतच त्याची पत्नी अनुष्का आणि इतर दिग्गजांनीही यावरुन टीका केली. त्यामुळेच याची गंभीर दखल घेत हॉटेल प्रशासनाने हॉटेलच्या कॉन्ट्रॅक्टरला काढून टाकले आहे.

कोहलीचा संताप

आपल्या आवडत्या खेळाडूला पाहून चाहते आनंदित होतात हे मी समजू शकतो. त्याचे मी कायमंच कौतुक करत आलो आहे. पण हा व्हिडिओ माझी प्रायव्हसी धोक्यात आणणारा आहे. जर मला माझ्या हॉटेल रुममध्ये प्रायव्हसी मिळत नसेल तर प्रसनल स्पेसची अपेक्षा मी कशी काय करू शकतो. लोकांच्या प्रायव्हसीचा सन्मान करा आणि त्यांना आपल्या मनोरंजनाचं साधन समजू नका, अशा शब्दांत विराट कोहलीने याप्रकरणी संताप व्यक्त केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.