ICC चा मोठा निर्णय! T-20 विश्वचषकाआधी क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल

ऑक्टोबर महिन्यापासून टी-२० क्रिकेट विश्वचषकाला सुरूवात होणार आहे. विश्वचषकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मोठा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबरपासून या नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. बदललेल्या नियमांनुसार हा टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे.

( हेही वाचा : सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना थकित रक्कम त्वरित द्यावी, राज्य मानवाधिकार आयोगाचे आदेश)

हे नवे नियम काय आहेत जाणून घेऊया…

 • आयसीसीच्या नवीन नियमांनुसार झेलबाद झाल्यावर नवीन फलंदाज फलंदाजी करेल.
 • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने गेल्या दोन वर्षांपासून चेंडूवर लाळ लावण्यास बंदी केली होती हा नियम यापुढेही लागू असणार आहे. म्हणजेच आता पुढील नियम बदलेपर्यंत कोणताही गोलंदाज चेंडूला लाळ लावू शकणार नाही.
 • फलंदाजाला कसोटी आणि वन डे सामन्यांमध्ये दोन मिनिटांमध्ये तर टी-२० मध्ये ९० सेकंदात सज्ज व्हावे लागेल.
 • फिल्डिंग करताना फलंदाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी कोणतेही अवैध कृत्य केल्यास किंवा हावभाव केल्यास दंड म्हणून फलंदाजाला ५ धावा दिल्या जातील. आधी अशा चेंडूला डेड बॉल म्हटले जायचे.
 • ज्या चेंडूवर फलंदाज खेळपट्टी सोडून शॉट खेळेल त्या चेंडूला नो बॉल दिला जाईल.
 • आता वनडेमध्येही स्लो ओव्हर रेट हा नियम लागू होणार आहे.
 • टी २० प्रमाणेत आता एकदिवसीय क्रिकेटमध्येही षटक वेळेवर पूर्ण न झाल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला ३० यार्डच्या आत अतिरिक्त एक खेळाडू ठेवावा लागेल.
 • गोलंदाजाने गोलंदाजी करण्यापूर्वी साथीदार फलंदाज क्रिझमधून बाहेर पडला आणि त्याला धावबाद केल्यास त्याला बाद घोषित केले जाईल.

भारताचे सुरूवातीचे पाच सामने

 • पहिला सामना २३ ऑक्टोबर भारत विरूद्ध पाकिस्तान
 • दुसरा सामना २७ ऑक्टोबर भारत विरूद्ध अ गटातील उपविजेता संघ
 • तिसरा सामना ३० ऑक्टोबर भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका
 • चौथा सामना २ नोव्हेंबर भारत विरूद्ध बांगलादेश
 • पाचवा सामना ६ नोव्हेंबर भारत विरूद्ध ब गटातील विजेता

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here