- ऋजुता लुकतुके
भारताचा अनुभवी आणि स्टार बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणीचा समावेश चीनच्या शांग्राओ शहरातील मानाच्या बिलियर्ड्स संग्रहालयात हॉल ऑफ फेममध्ये करण्यात आला आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात पंकजने ३८ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय बिलियर्ड्स व स्नूकर फेडरेशनचं २८ वं विजेतेपद पटकावलं होतं. (Billiards Hall of Fame)
भारताच्याच सौरभ कोठारीचा पराभव करत पंकजने हे विजेतेपद पटकावलं. ‘जागतिक बिलियर्ड्स संग्रहालयाने मला हॉल ऑफ फेममध्ये स्थान देऊन माझा सन्मानच केला आहे. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मला प्रेम आणि सहकार्य देणाऱ्या सर्वांचे या निमित्ताने मी आभार मानतो,’ असं पंकजने यावेळी ट्टिट केलं आहे. (Billiards Hall of Fame)
An honour and privilege to be inducted into the Hall Of Fame at the World Billiards Museum in Shangrao City, Yushan, China 🙏🏻😊 pic.twitter.com/UP4d4HWLjE
— Pankaj Advani (@PankajAdvani247) March 18, 2024
(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : अर्ज भरण्यास सुरुवात, तरी राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा पत्ता नाही…)
पंकजने हे विक्रम केले नावावर
‘देशाचं आणि बिलियर्ड्स सारख्या खेळाचं प्रतिनिधित्व करू शकलो, याचा मला अभिमान आहे. इथून पुढेही मी खेळासाठीच काम करत राहीन. आणि खेळाला मोठं करण्याचा प्रयत्न करेन,’ असं पुढे पंकजने म्हटलं आहे. दहाव्या वर्षी बिलियर्डसकडे वळलेल्या पंकजने अकराव्या वर्षीच आपली पहिली स्पर्धा जिंकली होती. आणि त्यानंतर जागतिक स्तरावर त्याचा उदय चौदाव्या वर्षी झाला. तेव्हापासून बिलियर्ड्स आणि स्नूकरमधील अनेक विक्रम त्याने नावावर केले आहेत. (Billiards Hall of Fame)
एकाच हंगामात ५ राष्ट्रीय, प्रादेशिक आणि जागतिक विजेतेपदं पटकावणारा तो एकमेव आणि आतापर्यंतचा पहिला बिलियर्ड्सपटू आहे. बिलियर्ड्समध्ये त्याने एकूण ८ जागतिक विजेतेपदं पटकावली आहेत. तर दीर्घ मुदतीच्या खेळातही त्याच्या नावावर ९ विजेतेपदं जमा आहेत. बिलियर्ड्सच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला पंकज अडवाणी पहिला भारतीय आहे. (Billiards Hall of Fame)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community