भारताचे महान फिरकीपटू बिशन सिंग बेदी (Bishan Singh Bedi) यांचे वयाच्या ७७व्या वर्षी निधन झाले. १९६७ ते १९७९ या कालावधी त्यांनी भारतासाठी ६७ कसोटी सामन्यांत प्रतिनिधित्व केले आणि २६६ विकेट्स घेतल्या. १० वन डे सामन्यांत त्यांच्या नावावर ७ विकेट्स आहेत.
बेदी, इरापल्ली प्रसन्ना, बीएस चंद्रशेखर आणि एस वेंकटराघवन हे भारताच्या फिरकी गोलंदाजीच्या (Bishan Singh Bedi) आक्रमणाचे जनक होते. बेदी यांनी भारताला पहिली वन डे मॅच जिंकून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. त्यांनी १९७५च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ईस्ट आफ्रिकेविरुद्ध १२-८-६-१ अशी स्पेल टाकली आणि आफ्रिकेला १२० धावांवर रोखले. (Bishan Singh Bedi)
Former India cricketer Bishan Singh Bedi dies: Sources
— Press Trust of India (@PTI_News) October 23, 2023
(हेही वाचा – Asian Games 2023 : भारतीय महिला मुष्टीयोद्धीला गमावावं लागू शकतं आपलं पदक )
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये बेदी (Bishan Singh Bedi) प्रथम उत्तर पंजाबसाठी खेळले, जेव्हा ते फक्त पंधरा वर्षांचे होते आणि १९६८-६९ मध्ये ते दिल्लीला गेले आणि १९७४-७५च्या रणजी करंडक स्पर्धा त्यांनी गाजवली, तसेच त्यांनी ६४ बळी घेतले. बेदी यांनी अनेक वर्षे इंग्लिश कौंटी क्रिकेटमध्ये नॉर्थम्प्टनशायरचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १५६० विकेट्ससह आपली कारकीर्द पूर्ण केली. (Bishan Singh Bedi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community