Bizarre Dismissal in Cricket : क्रिकेटमधील सगळ्यात विचित्र बळी

Bizarre Dismissal in Cricket : इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये विचित्र पद्धतीने फलंदाज बाद झाला आहे 

694
Bizarre Dismissal in Cricket : क्रिकेटमधील सगळ्यात विचित्र बळी
Bizarre Dismissal in Cricket : क्रिकेटमधील सगळ्यात विचित्र बळी
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेटमध्ये एखादा फलंदाज दहा पद्धतीने बाद होऊ शकतो. नियमावलीत तसं स्पष्टपणे लिहिलेलं आहे. इंग्लिश काऊंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेटचा फलंदाज नेड लिओनार्द मात्र या सगळ्याच्या पलीक़डे विचित्र पद्धतीने बाद झाला. या बळीची नोंद कागदावर झेलबाद अशी होईल. पण, हा धेल समोरच्या फलंदाजाच्या बॅटला लागून उडला. आणि गोलंदाजाने फॉलो-थ्रूमध्ये तो अलगद टिपला.  (Bizarre Dismissal in Cricket)

(हेही वाचा- Pune Porsche Car Accident : ‘त्या’ 300 शब्दांच्या निबंधाविषयी संतापच; जामीन प्रक्रियेत त्रुटी आढळल्याचा अहवाल)

फलंदाजाने चेंडू टोलवल्यावर तो जमिनीवर टप्पा न पडता झेलला गेला असेल तर फलंदाज बाद होतो. त्यामुळे लिओनार्डला मैदान सोडावं लागलं. (Bizarre Dismissal in Cricket)

२००६ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका टी-२० सामन्यात असाच प्रसंग घडला होता. जेहान मुबारकचा चेंडू अँड्र्यू सायमंड्सने टोलवला. तो सहकारी फलंदाज मायकेल क्लार्कच्या बूटांना लागून उडाला. आणि दिलशानने तो मिडऑनला सहज पकडला होता. सायमंड्सला बाद व्हावं लागलं. (Bizarre Dismissal in Cricket)

 असंच काहीसं यॉर्कशायर विरुद्ध सॉमरसेट सामन्यात घडलं. तो व्हीडिओही तुम्ही इथे पाहू शकता. (Bizarre Dismissal in Cricket)

(हेही वाचा- Suryakumar Yadav : निवड समिती, गंभीरला पांड्याऐवजी सूर्यकुमार कप्तान म्हणून का हवा?)

बेन क्लिफच्या गोलंदाजीवर लिओनार्डने स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारला. चेंडू नॉन स्ट्रायकर एंडला असलेल्या फलंदाजाच्या खांद्याला लागून थेट क्लिफच्या हातात गेला. लिओनार्डला शून्यावर बाद व्हावं लागलं. तर बेन क्लिफने सामन्यात ३० धावांत ३ बळी घेतले. सॉमरसेटने हा सामना ६६ धावांनी जिंकला. (Bizarre Dismissal in Cricket)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.