IND vs NZ Semi Final ICC World Cup सामन्याच्या तिकिटांच्या काळाबाजाराचा मुंबई पोलिसांनी पर्दाफास केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मालाड आणि दक्षिण मुंबईतून दोन जणांना ताब्यात घेऊन त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून उपांत्य फेरीची दोन तिकिटे मिळून आली आहे.
या तिकिटांची मूळ किंमत २० हजार रुपये असून ती तिकिटे १ लाख २० हजारांना काळ्या बाजारात विक्रीसाठी ऑनलाइन ठेवण्यात आली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त करण्यात आलेली तिकिटे किमतीच्या चार पटीने काळ्याबाजारात विकत होते अशी माहिती परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली.
आकाश कोठारी आणि रोशन गुरुबक्षनी या दोघांना सर. जे.जे.मार्ग पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे असून रोशन गुरुबक्षनी याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून २ तिकिटे जप्त करण्यात आली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. उपांत्य फेरीच्या सामना बघण्यासाठी देशभरातील तसेच देशाच्या बाहेरून क्रिकेटप्रेमी येणार आहेत. या उपांत्य फेरी सामन्याची तिकिटांची विक्री ऑनलाइन करण्यात येत आहे. ऑनलाइन तिकिटांची विक्री फुल्ल झाली असून हा सामना बघण्यासाठी क्रिकेटप्रेमी तिकिटासाठी अव्वाच्या सव्वा दराने तिकिटे खरेदी करण्यास तयार असल्यामुळे काही जणांनी उपांत्य फेरी सामान्यांच्या तिकिटांचा काळाबाजार सुरू केला आहे.
(हेही वाचा Muslim : श्री कानिफनाथ मंदिरात पुजारी-भाविकांना मारहाण करणे धर्मांधांची ‘मोगलाई’च; मास्टरमाइंड शोधा)
वेगवेगळ्या समाज माध्यमावर तसेच वेबसाईटवर तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती जे.जे.मार्ग पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोगस ग्राहक बनून एका वेबसाईटवर काळ्याबाजारात तिकिटे खरेदी करण्याची तयारी दर्शवून मालाड येथून मंगळवारी आकाश कोठारी याला तिकिटांची विक्री प्रकरणी ताब्यात घेतले, परंतु पोलिसांना त्याचाकडे एकही तिकीट मिळून आले नाही, दरम्यान पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत रोशन गुरुबक्षणी यांच्याकडे तिकिटे असल्याची माहिती मिळाली. यमाहितीच्या आधारे पोलिसानी रोशन गुरुबक्षणी याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून उपांत्य फेरी सामन्याची दोन तिकिटे जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे यांनी दिली. जप्त करण्यात आलेल्या तिकिटांची मूळ किंमत २० हजार असून ही तिकिटे काळ्याबाजारात चार ते पाच पटीने विक्री करण्यात येत होती अशी माहिती डॉ. मुंढे यांनी दिली. दरम्यान तिकिटांचा काळाबाजार ज्या वेबसाईटवर सुरू होता त्याच्यावर तिकिटांचे दरपत्रक देण्यात आले होते.
उपांत्य फेरीचे काळ्या बाजारातील दरपत्रक
उपांत्य फेरी सामन्याच्या तिकिटांचे काळाबाजारातील दरपत्रक एका वेबसाईटवर (संकेतस्थळ) देण्यात आले होते, त्यात खालील प्रमाणे तिकिटांचे दर आणि माहिती देण्यात आली होती.
क्रिकेट विश्वचषक उपांत्य फेरी – १ : वानखेडे, मुंबई
तिकिटे
- सुनील गावस्कर लेव्हल 2 – 27,000
- गरवारे स्तर 3 – 33,000
- सचिन लेव्हल 3 – 32,000
- सचिन लेव्हल 1 – 40,000
- दिवेचा स्तर 2 – 45,000
- गरवारे स्तर 1 – 50,000
- सेमी हॉस्पिटॅलिटी (यूएल फूड बुफे, बीअर आणि वाईन)
- सचिन तेंडुलकर लेव्हल 2 – 1,20,000
- दिलीप वेंगसरकर लेव्हल 2 – 1,20,000
- MCA स्तर 1 (फूड कूपनसह ज्यामध्ये अन्न आणि मद्य दोन्ही आहेत) – 1,00,000
- AC बॉक्स 2.5 लाख पासून सुरू होतो (सचिन तेंडुलकर लेव्हल 2 आणि Mca लेव्हल 3)