Border-Gavaskar 2024 : ऑस्ट्रेलियात ३ भारतीय खेळाडूंवर दुखापतीची टांगती तलवार

Border-Gavaskar 2024 : कोहली, राहुल आणि सर्फराझ यांना चेंडू बसल्यामुळे रुग्णालयात जावं लागलं. 

32
Border-Gavaskar 2024 : ऑस्ट्रेलियात ३ भारतीय खेळाडूंवर दुखापतीची टांगती तलवार
  • ऋजुता लुकतुके

बोर्डर-गावस्कर चषकाची तयारी करणाऱ्या भारतीय संघाला मालिका सुरू होण्यापूर्वीच तीन धक्के बसले आहेत. सराव सामन्या दरम्यान ३ महत्त्वाच्या खेळाडूंना चेंडू बसल्यामुळे सराव अर्धवट सोडावा लागला. त्यापैकी विराटने स्कॅन करून घेण्यासाठी थेट रुग्णालय गाठलं. तर राहुल आणि सर्फराझलाही सराव अर्धवट सोडावा लागला. २२ तारखेपासून पहिली कसोटी सुरू होणार आहे आणि त्यापूर्वी हा धक्का भारतीय संघाला बसला आहे. दुखापतीचं स्वरुप अजून कळलेलं नाही. (Border-Gavaskar 2024)

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात विराट कोहलीकडून खूप आशा आहेत, मात्र आता त्याच्या दुखापतीच्या बातम्या समोर येत आहेत. सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार, कोहली त्याच्या दुखापतीचे स्कॅनिंग करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेला होता. त्याला कुठे दुखापत झाली आणि ती कोणत्या प्रकारची आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. कोहलीची दुखापत गंभीर ठरल्यास मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का असू शकतो. (Border-Gavaskar 2024)

(हेही वाचा – Israel च्या निशाण्यावर आता ‘हा’ मुस्लिम देश; हल्ल्यात १५ लोकांचा मृत्यू)

तर मधल्या फळीतील फलंदाज सर्फराज खानला गुरुवारी, १४ नोव्हेंबरला सराव सत्रादरम्यान नेटमध्ये फलंदाजी करताना कोपरला दुखापत झाली. ‘फॉक्स क्रिकेट’ने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सर्फराझ नेटमधून बाहेर पडताना उजवा हात धरलेला दिसत होता. यावेळी तो काहीसा अस्वस्थ दिसत होता. मात्र, दुखापत किती गंभीर आहे हे अजून कळले नाही. (Border-Gavaskar 2024)

शुक्रवारी सकाळी पर्थ येथे सराव करताना केएल राहुलला दुखापत झाली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बोर्डर-गावस्कर चषकाच्या पहिल्या सामन्यापूर्वी सेंटर विकेट मॅच सिम्युलेशन दरम्यान राहुलला उजव्या कोपराला दुखापत झाली. त्यामुळे भारतातील तणाव वाढला आहे. भारतीय संघ याआधी ऑस्ट्रेलिया ए संघाबरोबर एक सराव सामना खेळणार होता. पण, अचानक हा सामना रद्द करून फलंदाज विरुद्ध गोलंदाज असा सराव सामना सध्या भरवण्यात येत आहे. (Border-Gavaskar 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.