-
ऋजुता लुकतुके
बोर्डर – गावसकर मालिकेत भारतीय संघाचा १-३ ने दारुण पराभव झाला. काही सत्रांवर भारतीय संघाने वर्चस्व गाजवलं. पण, पर्थचा अपवाद वगळता, संघाला कसोटीवर वर्चस्व मिळवता आलं नाही. खासकरून रोहित शर्मा आणि विराट कोहलीचं अपयश संघाला भोवलं. तर गौतम गंभीरचा मुख्य प्रशिक्षक म्हणूनही प्रभाव दिसला नाही. आता बुधवारी भारतीय संघ मायदेशी परतला आहे. आणि या कामगिरीचे पडसाद उमटणार याची तयारीही त्यांनी ठेवली आहे. बीसीसीआयने अर्थातच भारतीय संघाच्या कामगिरीची दखल घेतली आहे. पण, आयएएनएस वृत्तसंस्थेनं दिलेल्या बातमीनुसार, गंभीर, रोहित आणि विराटही चॅम्पियन्स करंडक तसंच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीही संघात कायम राहणार आहेत. (Border – Gavaskar Debacle Review)
(हेही वाचा- Vijay Hazare ODI Tournament : प्रसिध कृष्णा, देवदत्त पड्डिकल, वॉशिंग्टन सुंदर विजय हजारे स्पर्धेसाठी उपलब्ध)
विराट आणि रोहित भारतीय कसोटी संघाचा अविभाज्य भाग आहेत. मागच्या दहा वर्षांत संघाचं नेतृत्व करण्याबरोबरच क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर नेण्याचं काम या दोघांनी केलं आहे. टी-२० विश्वचषक विजयातही दोघांचा वाटा होता. त्यानंतर मात्र दोघांची कामगिरी कसोटींत चांगली झालेली नाही. आता ऑस्ट्रेलियातील कामगिरीनंतर दोघांवर लगेचच टाच येणार नाही, असं या बीसीसीआय अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. तर गौतम गंभीरवरही बीसीसीआयचा विश्वास असल्याचं ते सांगतात. (Border – Gavaskar Debacle Review)
‘अरे! एका मालिकेनंतर असं काही बदलत नसतं. बीसीसीआय पराभवाची चौकशी नक्की करेल. पण, सगळा दोष गौतम गंभीरला दिला जाणार नाही. गंभीरच भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल. आणि आगामी चॅम्पियन्स करंडत तसंच इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतही विराट, रोहित खेळतील,’ असं या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करता आयएएनएस वृत्तसंसथेशी बोलताना सांगितलं. (Border – Gavaskar Debacle Review)
(हेही वाचा- Dadar Railway स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या आरोपीचा धक्कादायक खुलासा; म्हणाला, मला…)
विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुरुवात शतकाने केली. पण, त्यानंतर उर्वरित ८ डावांमध्ये त्याने ९० धावा केल्या. तर रोहितही एकदाच दुहेरी आकडा गाठू शकला. त्याची सरासरी तर ६.२ इतकी कमी होती. बोर्डर – गावसकर मालिका संपल्यानंतर गौतम गंभीरनेही विराट आणि रोहित आणखी काही काळ भारतासाठी खेळू शकतील, असं म्हटलं होतं. दोघांमध्ये धावांची भूक अजूनही आहे, असं त्याचं म्हणणं होतं. (Border – Gavaskar Debacle Review)
भारतीय संघ आता जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात इंग्लंड विरुद्ध ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. आणि त्यानंतर चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी संघ दुबईला रवाना होईल. आता भारतीय संघाची पुढील कसोटी मालिका आहे ती जून महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर होणारी ५ कसोटी सामन्यांची मालिका. (Border – Gavaskar Debacle Review)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community