Border – Gavaskar Test, Melbourne Test : मेलबर्न विमानतळावर विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन पत्रकारादरम्यान नेमकं काय घडलं?

Border - Gavaskar Test, Melbourne Test : विराट कोहली आणि चॅनल ७ पत्रकारादरम्यान बाचाबाची झाली होती

51
Border - Gavaskar Test, Melbourne Test : मेलबर्न विमानतळावर विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन पत्रकारादरम्यान नेमकं काय घडलं?
Border - Gavaskar Test, Melbourne Test : मेलबर्न विमानतळावर विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन पत्रकारादरम्यान नेमकं काय घडलं?
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनहून मेलबर्नला पोहोचला, तेव्हा विमानतळावर विराट कोहली आणि एका ऑस्ट्रेलियन वाहिनीच्या छायाचित्रकाराचं भांडण झालं. आधी कोहली आणि त्या पत्रकाराचा वाद झाला. त्यानंतर कोहली तिथून पुढे निघून गेला. पण, काही सेकंदातच तो मागे फिरला. त्यांच्यात पुन्हा काही मिनिटांसाठी बोलाचाली झाली. हा सगळा प्रकार चॅनल सेव्हनच्या कॅमेरांनी टिपला आहे. सोशल मीडियावरही प्रसिद्ध केला आहे. (Border – Gavaskar Test, Melbourne Test)

(हेही वाचा- Kalyan Marathi Family Case : “आता माज उतरवण्याची वेळ आलीय”, मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी मनसे आक्रमक)

विराट कोहलीबरोबर त्याची पत्नी अनुष्का आणि मुलं वामिका, अकाय आहेत. मुलांचे फोटो किंवा व्हीडिओ मीडियात दाखवले जाऊ नयेत यासाठी विराट नेहमी जागरुक असतो. ऑस्ट्रेलियन वाहिनी मुलांचं चित्रण करत असल्याचा संशय विराटला आला. आणि त्यामुळे तो चिडल्याचं समजतंय. वाहिनीच्या महिला पत्रकाराने मुलांचं चित्रण करणार नाही, असं विराटला सांगितल्यावर मग विराट शांत झाला. नंतर त्याने या वाहिनीच्या तंत्रज्जांबरोबर हस्तांदोलनही केलं. (Border – Gavaskar Test, Melbourne Test)

 ‘माझी मुलं बरोबर असताना मला खाजगीपण जपायचं असतं. मला विचारल्याशिवाय त्यांचं चित्रण तुम्ही करू शकत नाही,’ असं विराट महिला छायाचित्रकाराला सांगताना दिसतो. ऑस्ट्रेलियात सार्वजनिक ठिकाणी सेलिब्रिटी तसंच सामान्य लोकांचंही चित्रण करणं ही सर्वसाधारण गोष्ट आहे. अर्थात, त्या व्यक्तीने आक्षेप घेतल्यास चित्रण दाखवलं जाऊ शकत नाही. विराटनेही चर्चेनंतर वाहिनीबरोबर हा मुद्दा सोडवला. (Border – Gavaskar Test, Melbourne Test)

(हेही वाचा- EPF Withdrawal : ईपीएफमधील पैसे आता एटीएममधून काढता येणार; काय आहे प्रक्रिया?)

मैदानावर विराटचं आता लक्ष असणार आहे ते मेलबर्न कसोटीत धावा करण्यावर. विराट आपल्या फलंदाजीवर मेहनत घेतानाही दिसत आहे. पण, प्रत्यक्ष मैदानावर विराटकडून पर्थ कसोटी सोडली तर धावा झालेल्या नाहीत. (Border – Gavaskar Test, Melbourne Test)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.