Border-Gavaskar Trophy 2024 : अजित आगरकर अख्खी मालिका ऑस्ट्रेलियातच राहणार, गंभीरबरोबर बनवणार भारतीय संघासाठी कार्यक्रम

Border-Gavaskar Trophy 2024 : एकप्रकारे गंभीरला हा इशारा असल्याचं बोललं जातंय. 

45
Border-Gavaskar Trophy 2024 : अजित आगरकर अख्खी मालिका ऑस्ट्रेलियातच राहणार, गंभीरबरोबर बनवणार भारतीय संघासाठी कार्यक्रम
  • ऋजुता लुकतुके

न्यूझीलंड विरुद्धचा पराभव भारतीय संघाच्या चांगलाच जिव्हारी बसला आहे. त्यामुळे बीसीसीआयनेही कंबर कसली असून संघाच्या रणनीतीवर काम करण्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सध्या ऑस्ट्रेलियातच आहेत. ही अख्खी मालिका ते तिथेच राहणार आहेत. एकप्रकारे हा गौतम गंभीरसाठी हा इशाराच आहे आणि संघाच्या रणनीतीत अजित आगरकरचाही समावेश असणार हे यातून दिसत आहे. त्याचबरोबर भारतीय संघाची आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठीची रणनीतीही आताच ठरवण्याचा बीसीसीआयला विचार आहे. ऑस्ट्रेलियात गौतम गंभीर, अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्याबरोबरच इतर ज्येष्ठ खेळाडू मिळून भारतीय संघासाठी नियोजन केलं जाणार आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा – Ind vs Aus, Perth Test : पर्थ कसोटीत पहिल्या दिवशी २१७ धावांवर १७ बळी, अनेक विक्रमांची मोडतोड)

आगरकर आणि गंभीर भारतीय संघातील आताचे खेळाडू कोण कोण आहेत, त्यांची तयारी काय आहे आणि कारकीर्दीत त्यांची पुढे वाटचाल कशी असू शकेल याचा आढावा घेऊन भारतीय संघासाठी दीर्घकालीन योजना बनवण्यात येणार आहे. आणि त्यात अजित आगरकर यांचा १०० टक्के सहभाग असणार आहे. या आधीच्या मालिकांमध्ये निवडलेला संघ आणि गंभीर यांना प्रशिक्षक म्हणून अपेक्षित असलेला संघ यातही तफावत दिसली. त्यामुळे काही खेळाडूंना संघ निवडीनंतर संघात सामील करून घ्यावं लागलं. तसंच अंतिम अकरामध्ये कुणाला खेळवायचं यावरूनही दोघांमध्ये समन्वय नसल्याचं दिसून आलं होतं. ही तफावत दूर करण्यासाठी अजित आगरकर आणि गौतम गंभीर एकत्र राहून पुढील नियोजन करणार आहेत. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : वरळीत कोण ठरणार डार्क हॉर्स?)

‘मायदेशातील मालिकेत पराभव झाल्यामुळे संघावर टीका होणार याची बीसीसीआय आणि संघ प्रशासनालाही कल्पना आहे. तसंच नवीन संघ उभारणीची प्रक्रियाही दीड वर्षं चालणारी असेल असा सगळ्यांचा अंदाज आहे. आणि तेवढा वेळ दोघांना मिळावा असंच बीसीसीआयचंही मत आहे. आता नवीन कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी दोघांनी एकच रणनीती आखावी असं बीसीसीआयने दोघांना सांगितलं आहे,’ असं बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. ऑस्ट्रेलिया दौरा मोठा असल्यामुळे या कालावधीत दोघांना एकत्र वेळ मिळेल, तेव्हा संघाची पुढची रणनीती तयार करावी असं दोघांना सांगण्यात आलं आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.