-
ऋजुता लुकतुके
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचं क्रिकेट मैदानावरील वैर हे ॲशेस मालिकेइतकं रंगतदार ठरत आहे. आणि त्यामुळे या मालिकांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंतच्या तीनही कसोटींसाठी मैदानावर सरासरी ३०,००० लोकांनी गर्दी केली होती. तसंच भारतात टीव्हीवरही या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पर्थ आणि ॲडलेडमध्ये झालेल्या पहिल्या दोन कसोटी या ८६ दशलक्ष लोकांनी पाहिल्या आहेत. (Border – Gavaskar Trophy 2024)
(हेही वाचा- Bipin Rawat: देशाचे पहिले CDS जनरल बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर अपघाताचे कारण आलं समोर!)
१२.८ अब्ज मिनिटं लोकांनी या कसोटी पाहिल्याचं स्टार स्पोर्ट्स वाहिनीने स्पष्ट केलं आहे. २०२० साली ऑस्ट्रेलियातच झालेल्या मालिकेच्या तुलनेत या मालिकेची प्रेक्षक संख्या ५५ टक्क्यांनी वाढली आहे. ॲडलेडला झालेली दुसरी कसोटी भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेआठ वाजता सुरू होत होती. ही कसोटी अडीच दिवस मिळून ४९ दशलक्ष लोकांनी पाहिली. २०२० साली झालेल्या दिवस – रात्र कसोटीच्या तुलनेत ही प्रेक्षक संख्या २२ टक्क्यांनी जास्त होती. प्रेक्षकांनी एकूण ४.२ अब्ज मिनिटं हा सामना पाहिला. (Border – Gavaskar Trophy 2024)
ॲडलेड कसोटीला त्या आठवड्यातील सर्वाधिक टीव्हीआरही मिळाला. आणि २०२० च्या तुलनेत टीव्हीआरमध्ये २२ टक्क्यांची वाढ झाली. टीव्हीआर म्हणजे टेलिव्हिजन रेटिंग. किती लोकांनी कसोटी पाहिली याचं मोजमाप. बोर्डर – गावसकर मालिकेने प्रेक्षक संख्येच्या बाबतीत ॲशेस मालिकेला कधीच मागे टाकलं आहे. (Border – Gavaskar Trophy 2024)
(हेही वाचा- Missile Company Ban: अमेरिकेकडून पाकिस्तानच्या ४ क्षेपणास्त्र कंपनीवर बंदी)
सध्या या मालिकेच्या ३ कसोटी पार पडल्या असून १-१ अशी बरोबरी आहे. उर्वरित दोन कसोटी मेलबर्न आणि सिडनी इथं होणार आहेत. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी या कसोटी महत्त्वाच्या आहेत. आणि ही मालिका जिंकणारा संघ कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीसाठी थेट पात्र होईल. मेलबर्न कसोटी २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. (Border – Gavaskar Trophy 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community