-
ऋजुता लुकतुके
क्रिकेट जगतात सगळ्यांना उत्सुकता आहे ती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या बोर्डर गावसकर चषका (Border – Gavaskar Trophy 2024) अंतर्गत होणाऱ्या कसोटी मालिकेची. आणि नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या या मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्टार अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) पाठीच्या दुखापतीने बेजार झाला आहे. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून त्याने माघार घेतली आहे.
पाठीच्या दुखापतीमुळे कॅमेरॉन ग्रीनचे (Cameron Green) भारताविरुद्ध खेळणंही धोक्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघासाठी कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) कसोटी संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची (Border – Gavaskar Trophy 2024) स्पर्धा २२ नोव्हेंबरपासून खेळवली जाणार आहे. या मालिकेत एकूण पाच कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. याआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात येणाऱ्या एकदिवसीय सामन्यात ग्रीनला दुखापत झाली. या सामन्यात कॅमेरॉन ग्रीनने ४२ धावा करत २ बळीही मिळवले होते.
(हेही वाचा – Retired वीज कर्मचाऱ्यांचे Azad Maidan मध्ये निवृत्ती वेतनासाठी साखळी उपोषण)
कॅमेरॉन ग्रीन (Cameron Green) सध्या तीनही प्रकारात ऑस्ट्रेलियन संघाचा भाग आहे. कॅमेरॉन ग्रीनने आतापर्यंत २८ कसोटी सामन्यांमध्ये १,३७७ धावा आणि ३५ बळी मिळवले आहेत. भारताविरुद्धच्या त्याच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने ११ डावांत ३६.५५ च्या सरासरीने ४०२ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एक शतक आणि एक अर्धशतकही आहे. भारताविरुद्ध कॅमेरॉन ग्रीनने आतापर्यंत २ बळी मिळवले आहेत. बोर्डर – गावसकर चषकाचा कार्यक्रम पाहूया,
पहिली कसोटी – २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी – ६ ते १० डिसेंबर, ॲडलेड
तिसरी कसोटी – १४ ते १८ डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी – २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी – ३ ते ७ जानेवारी,सिडनी
हेही पहा –
Join Our WhatsApp Community