Border-Gavaskar Trophy 2024 : बोर्डर-गावस्कर चषक मालिका ही गौतम गंभीरची ‘गंभीर’ परीक्षा?

Border-Gavaskar Trophy 2024 : न्यूझीलंड विरुद्ध मायदेशात झालेल्या पराभवामुळे गौतम गंभीरवर टीका होत आहे. 

33
Border-Gavaskar Trophy 2024 : बोर्डर-गावस्कर चषक मालिका ही गौतम गंभीरची ‘गंभीर’ परीक्षा?
  • ऋजुता लुकतुके

पर्थ कसोटीत पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारतीय संघाने कसोटीत पुनरागमन केलं आहे. त्याने सगळ्यात मोठा दिलासा मिळाला असेल तो मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला. कारण, मायदेशात न्यूझीलंड विरुद्ध ०-३ असा सपाटून मार खाल्ल्यामुळे प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीर यांच्या कामगिरीची नकारात्मक चर्चा सुरू झाली होती. बीसीसीआयचं त्यांच्यावर लक्ष असेल असंही बोललं जात होतं. बीसीसीआयनेही काही पावलं तातडीने उचलली. ऑस्ट्रेलियाला संघ रवाना होण्यापूर्वी त्यांनी संघाचा कर्णधार रोहित शर्मा, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांची एक बैठक बोलावली. त्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कुणाचे अधिकार काय आहेत याचाही फेरआढावा घेण्यात आल्याचं समजतंय. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा – Assembly Election : विधानसभेत चालला नाही मुस्लिमांचा फतवा; ‘एक है तो सेफ है’ ने वाढला हिंदूंच्या मतांचा टक्का)

आता भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचं खडतर आव्हान आहे आणि ही गौतम गंभीर यांचीही परीक्षा असणार आहे. गौतम गंभीर टी-२० विश्वचषक विजेतेपदानंतर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक झाले तेव्हा भारतीय संघ क्रिकेटच्या तीनही प्रकारात अव्वल होता. हे वर्चस्व टिकवून ठेवण्याची जबाबदारी गंभीर यांच्यावर होती. सुरुवातच झाली ती भारतीय संघाने श्रीलंकेत टी-२० मालिका गमावण्याने. त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध घरच्या मालिकेतील पराभवाने तर गंभीर यांची अवस्था आणखी बिकट झाली आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा – Assembly Election Results 2024: अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपाची मोठी फिल्डिंग; ‘या’ ६ नेत्यांवर सोपवली जबाबदारी)

भारतीय संघ सध्या स्थित्यंतरातून जात आहे. कारण, विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि रवी अश्विन सारखे खेळाडू हळू हळू कसोटीतूनही निवृत्त होणार आहेत आणि त्यांना बदली खेळाडू निवडणं पण, ते निवडताना संघाचं विजयी संतुलन ढळू न देणं हे महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीने गंभीरने आतापर्यंत फिरकीपटू म्हणून वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली आहे. तर ऑस्ट्रेलियात हर्षित राणा आणि नितिश रेड्डी यांच्याबरोबरच देवदत्त पड्डिकललाही आघाडीच्या फळीत संधी मिळाली आहे. आता या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात यश मिळालं तर फास्ट-ट्रॅक करून त्यांना संघात घेण्याचा गंभीर यांचा निर्णय योग्य ठरू शकेल. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा – Rahul Gandhi यांच्यावर डॉक्टर्स का आहेत नाराज?)

New Project 2024 11 22T192702.504

(हेही वाचा – Ind vs Aus, Perth Test : पर्थ कसोटीत पहिल्या दिवशी २१७ धावांवर १७ बळी, अनेक विक्रमांची मोडतोड)

न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाच्या काही तांत्रिक चुका समोर आल्या. बंगळुरू कसोटीत नाणेफेक जिंकूनही भारतीय संघाने पावसाने ओल्या झालेल्या खेळपट्टीवर भारताने पहिली फलंदाजी घेतली. आणि ३६ धावांमध्ये भारतीय संघ सर्वबाद झाला. तर श्रीलंका दौऱ्यात भारताचे २७ बळी फिरकीवर गेले असतानाही न्यूझीलंड विरुद्ध भारतीय संघाने फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टी बनवल्या. आणि त्या मालिकेत भारताला ०-३ ने पराभव पत्करावा लागला. रोहीत शर्माने या चुकांची जबाबदारी स्वत:वर घेतली असली तरी गंभीरचा या निर्णयांमध्ये किती वाटा होता हे गुलदस्त्यात आहे.

आता गंभीरसमोर ऑस्ट्रेलिया मालिकेचं आव्हान आहे. खेळाडू असताना गंभीरने नेपिअर आणि न्यूलँड्स या दोन कसोटींत ५ तासांच्या वर फलंदाजी करत भारतीय संघाला पराभवापासून वाचवलं होतं. आता भारतीय खेळाडूंनाही अशा कामगिरीसाठी प्रेरणा देण्याचं काम गंभीरला करावं लागणार आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.