Border – Gavaskar Trophy 2024 : पर्थमध्ये असा सुरू आहे भारतीय संघाचा सराव…

Border - Gavaskar Trophy 2024 : भारतीय संघाने सरावाच्या ठिकाणी काळे पडदे लावून गुप्तता राखली आहे 

71
Border - Gavaskar Trophy 2024 : पर्थमध्ये असा सुरू आहे भारतीय संघाचा सराव…
Border - Gavaskar Trophy 2024 : पर्थमध्ये असा सुरू आहे भारतीय संघाचा सराव…
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघासाठी कसोटीचा पुढील पेपर थोडा कठीण आहे. राष्ट्रीय संघाला ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाशी दोन हात करायचे आहेत. कसोटीआधी सरावासाठी भारतीय संघाकडे १० दिवस आहेत. या दिवसांत भारतीय खेळाडूंचा पर्थमध्ये जोरदार सराव सध्या सुरू आहे. न्यूझीलंड विरुद्घ मायदेशात झालेल्या ०-३ पराभवानंतर भारतीय संघ सध्या बॅकफूटवर आहे. त्यामुळेच असेल कदाचित पर्थमध्ये सरावादरम्यान संध प्रशासनाकडून कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. मंगळवारी के एल राहुल, यशस्वी जयसवाल आणि शुभमन गिल या आघाडीच्या फळीने फलंदाजीचा जोरदार सराव केला. विराट, जसप्रीत आणि अश्विन यांनी या सरावाला दांडी मारली होती. पण, बुधवारी हे तिघे जातीने हजर होते. (Border – Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा- Devendra Fadnavis : चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?)

ऑस्ट्रेलियातही भारतीय संघाचे खूप चाहते आहेत. त्यामुळेच असेल कदाचित भारतीय संघाने सरावाच्या ठिकाणी कमालीची गुप्तता बाळगली आहे. मैदानाच्या भोवती मोठे काळे पडदे लावण्यात आले आहेत. ट्रिस्टियन लेवेले हा फोर्ब्सचा पत्रकार सध्या ऑस्ट्रेलियात आहे. त्याच्या ट्विट्समधून भारतीय संघाच्या सरावाची कल्पना येते. सराळ आणि दुपारच्या सत्रात इथं सराव शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत. भारतीय संघाचं लक्ष फक्त सरावावरच रहावं यासाठी काळे पडदे लावण्यात आले आहेत. (Border – Gavaskar Trophy 2024)

 या मालिकेत विराट कोहलीवर सगळ्यांचं लक्ष असणार आहे. विराटही सरावावर लक्ष केंद्रीत करताना दिसतोय. बुधवारी सकाळच्या सत्रात त्याने फलंदाजीचा जोरदार सराव केला. चेंडू त्याच्या बॅटच्या मध्यभागी बसतानाही दिसत होते. आखूड टप्प्याचे आणि वेगवान चेंडू तो आरामात खेळताना दिसला. (Border – Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा- Ind vs SA, 3rd T20 : रममदीप सिंगचा पदार्पणातच एक अनोखा विक्रम)

विराटने पर्थमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. वाका मैदानावरील दोन कसोटी सामन्यांत त्याने ४४, ७५ आणि १२३ धावा केल्या आहेत. आताही विराट भारतीय संघाच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. त्याने आल्या आल्या सरावाला सुरुवात केली. भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानचा पहिला सामना २२ नोव्हेंबरला पर्थ इथं होणार आहे. (Border – Gavaskar Trophy 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.