Border-Gavaskar Trophy 2024 : ‘भारतीय संघ ३-१ ने बोर्डर-गावसकर मालिका जिंकेल’ – सुनील गावसकर

Border-Gavaskar Trophy 2024 : २०१४-१५ पासून हा करंडक भारताकडेच आहे.

112
Border-Gavaskar Trophy 2024 : ऑस्ट्रेलियातील सराव सामना रद्द करण्यावरून गावस्करांनी टोचले भारतीय संघाचे कान
  • ऋजुता लुकतुके

क्रिकेट जगताचं लक्ष आता नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बोर्डर-गावसकर चषकाकडे लागलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन तुल्यबळ संघ ५ कसोटींच्या मालिकेत आमने सामने येतील. यंदा ही मालिका भारतीय संघ ३-१ ने जिंकेल, असं भाकीत भारताचे माजी कर्णधार आणि लिटिलमास्टर सुनील गावसकर यांनी वर्तवलं आहे. २२ नोव्हेंबरला पर्थ इतं पहिली कसोटी सुरू होणार आहे. रोहित शर्माच्या भारतीय संघाने ही मालिका जिंकली तर ऑस्ट्रेलियन भूमीवर सलग तिसरी मालिका जिंकण्याचा पराक्रम भारतीय संघ करेल. (Border-Gavaskar Trophy 2024)

यापूर्वी २०१८ आणि २०२० मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकून बोर्डर-गावसकर चषक आपल्याकडेच राखला आहे. सध्या सुनील गावसकर मिड-डे वृत्तपत्रात एक स्तंभ लिहित आहेत. रविवारी आपल्या लेखात ते म्हणतात, ‘दोन्ही संघांमधील कसलेले खेळाडू आणि त्यांचं कौशल्य पाहता, बोर्डर-गावसकर चषक मालिका रंगतदार होईल, यात शंका नाही. कसोटी क्रिकेट हाच आपल्या लाडक्या खेळातील सर्वोत्तम प्रकार आहे, हे अधोरेखित करणारी ही मालिका असेल. आणि माझं भाकीत असं आहे की, भारत ही मालिका ३-१ ने जिंकेल.’

डेव्हिड वॉर्नरच्या निवृत्तीनंतर सलामीचा प्रश्न ऑस्ट्रेलियाला भेडसावेल, असंही गावसकर यांनी बोलून दाखवलं आहे.

(हेही वाचा – Jammu and Kashmir: लष्करी ठाण्यावर लपून गोळीबार! १ जवान हुतात्मा, शोधमोहीम सुरू)

सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या भारतीय संघालाही मोलाचा सल्ला दिला आहे. आशियाई खंडाच्या बाहेर सामना असेल तर भारतीय संघाची सुरुवात धिमी असते. तसंच या मालिकेची तयारी करायला भारताला पुरेसा वेळ मिळालेला नाही. याकडेही गावसकर यांनी लक्ष वेधलं आहे.

‘द आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतीय संघाची सुरुवात काहीशी धिमी असते. मग हळू हळू संघाला सूर गवसतो. पण, यंदा भारताला सुरुवातीपासून आपला आत्मविश्वास दाखवावा लागेल. हिला कसोटी सामना मोक्याचा असेल. एकतर भारतीय संघ पुरेसे प्रथमश्रेणी सामने न खेळता या मालिकेत उतरणार आहे. त्याचा फटकाही संघाला सुरुवातीला बसू शकतो,’ अशी भीती सुनील गावसकर यांनी व्यक्त केली आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

भारतीय संघ पर्थ इथं १५ नोव्हेंबरला आपल्याच संघाचे दोन भाग पाडून एक प्रदर्शनीय सामना खेळणार आहे. तर कॅनबेरा इथं एक दिवस-रात्रीची प्रदर्शनीय कसोटी खेळणार आहे. बाकी या दौऱ्यात एकही सराव सामना भारताला मिळणार नाही. तर ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी भारतीय संघ देशातच ५ कसोटी सामने खेळेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.