- ऋजुता लुकतुके
बोर्डर गावस्कर चषकासाठी भारतीय संघ सध्या सराव करत आहे आणि ही मालिका भारतीय संघासाठी अनेक अर्थाने महत्त्वाची ठरणार आहे. भारताचा कसोटी अजिंक्यपद अंतिम स्पर्धेतील प्रवेशही या मालिकेनंतर ठरणार आहे. त्यामुळे संघावर दडपणही आहे. पर्थमध्ये सरावादरम्यान मात्र खेळाडू अगदी गंभीर न राहता थोडी चेष्टा मस्करी करताना दिसतात. बीसीसीआयने अलीकडेच रिषभ पंत आणि जसप्रीत बुमराह यांच्यातील एक व्हिडिओ जारी केला आहे. त्यात दोघांनी पैज लावली आहे १०० डॉलरची. पैज अशी आहे की, पंतने बुमराहला गोलंदाजी करायची आहे आणि बादही करायचं आहे.
(हेही वाचा – Muslim : विधानसभा निवडणुकीत मुसलमान उमेदवार ४२०…)
A contest that left Bowling Coach @mornemorkel65 in conundrum 😃
Are you Team Bumrah or Team Pant?
🎥 WATCH and find out the most anticipated question – Did @RishabhPant17 dismiss @Jaspritbumrah93 🤔#TeamIndia | #AUSvINDhttps://t.co/zGypNwdTCl
— BCCI (@BCCI) November 15, 2024
व्हिडिओच्या सुरुवातीला पंत जसप्रीत बुमराहला नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसत होता. पंत म्हणतो – ‘मी तुला आऊट करेन, १००-१०० डॉलरची पैज होती.’ यावर बुमराह म्हणतो- ‘विकेट पडणार नाही. राहू दे.’ यावर पंतने उत्तर दिले की, मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एक विकेट घेतली आहे. यावर बुमराह म्हणतो, अभिनंदन, ती तू सजवून ठेव, आता गोलंदाजी कर.
पंत पहिला चेंडू टाकतो, जो बुमराहने सोडला. इथे चेंडू उचलताना पंत म्हणतो – ‘थांबा, मी तुला बाउन्सर मारतो.’ तो पुढचा चेंडू शॉर्ट लेंथवर टाकतो आणि बुमराह त्या चेंडूवर षटकार खेचतो. यावर पंत म्हणतो की तो आऊट झाला आहे. तो प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलला विचारतो की तो आऊट आहे की नाही. यावर प्रशिक्षक गोंधळून जातात. त्याचवेळी बुमराह म्हणतो की तू बरोबर बोलत नाहीएस. मी बाद झालेलो नाही. इथे पंत म्हणतो – तो नेटमध्ये आऊट झाला आहे.
(हेही वाचा – Maharashtra Assembly Election : राज्यात महायुतीची सत्ता यावी; दिल्लीतील मराठी भाषिकांचा कल)
व्हिडिओ पोस्ट करताना बीसीसीआयने लिहिले – ‘एक स्पर्धा ज्याने गोलंदाजी प्रशिक्षकाला विचार करायला लावला. तुम्ही टीम बुमराह की टीम पंत? पंतने बुमराहला बाद केले का? यावर चाहत्यांकडून मजेशीर प्रतिक्रिया येत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community