- ऋजुता लुकतुके
सध्या क्रिकेट जगतात सर्वाधिक चर्चा ही बोर्डर-गावस्कर चषकाचीच आहे. एकतर ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन आघाडीचे संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत आमने सामने आहेत. दुसरं म्हणजे आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या दृष्टीने या कसोटीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ऑस्ट्रेलियातील उसळत्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांचा कस लागणार आहे. भारतात घरी राहून टीव्हीवर ही मालिका पाहायची असेल तर समजून घेऊया कुठल्या वाहिनीवर किंवा ओटीटीवर या मालिकेचं प्रसारण होणार आहे ते. (Border-Gavaskar Trophy 2024)
खरंतर, कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी रोहीतच्या संघाला ऑस्ट्रेलियाचा किमान ४-० असा पराभव करावा लागेल. अशा स्थितीत भारतीय संघाला मालिकेत विजयाने सुरुवात करावी लागणार आहे. मात्र, यावेळी भारताला आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलियाही पूर्णपणे सज्ज असेल. रोहीत शर्मा पहिली कसोटी खेळणार नाही आहे. त्याच्या जागी जसप्रीत बुमरा संघाचं नेतृत्व करेल. (Border-Gavaskar Trophy 2024)
(हेही वाचा – महाराष्ट्रातील जनता विकासाला भरभरुन मतदान करेल: CM Eknath Shinde)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका जिओ सिनेमा किंवा सोनी लिव्हवर पाहायला मिळणार नाही, तर यावेळी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केली जाईल. याशिवाय चाहत्यांना डिस्ने + हॉटस्टार ॲपद्वारे या मालिकेच्या लाईव्ह स्ट्रीमिंगचा आनंदही घेता येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेसहा वाजता हे सामने सुरू होतील. पहिली पर्थ कसोटी मात्र सकाळी साडे सात वाजता सुरू होईल. तर दुसरी ॲडलेड कसोटी दिवस-रात्र खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे तिची वेळ आहे भारतीय वेळेनुसार सकाळी साडे नऊ वाजल्यापासून. (Border-Gavaskar Trophy 2024)
(हेही वाचा – Bitcoin Scam प्रकरणी सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण; म्हणाल्या…)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिली कसोटी : २२-२६ नोव्हेंबर, पर्थ (सकाळी ७.५०)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरी कसोटी : ६-१० डिसेंबर, ॲडलेड (सकाळी ९.३०)
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरी कसोटी : १४-१८ डिसेंबर, ब्रिस्बेन (सकाळी ५.५० )
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चौथी कसोटी : २६-३० डिसेंबर, मेलबर्न (सकाळी ५.०० )
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पाचवी कसोटी : २-७ जानेवारी, सिडनी (सकाळी ५.००)
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), सरफराज खान, विराट कोहली, प्रसीद कृष्णा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, ऋषभ. पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, हर्षित राणा, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघ : पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (विकेटकीपर), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशॅग्ने, नॅथन लायन, मिच मार्श , नॅथन मॅकस्विनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क (Border-Gavaskar Trophy 2024)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community