Border-Gavaskar Trophy 2024 : रवी शास्त्रींच्या मते ‘हे’ दोन खेळाडू गाजवणार भारताकडून ही मालिका

Border-Gavaskar Trophy 2024 : बोर्डर-गावस्कर चषकात कोण प्रभावी ठरेल याचा अंदाज शास्त्री यांनी व्यक्त केला. 

53
Border-Gavaskar Trophy 2024 : बोर्डर-गावस्कर चषक मालिका ही गौतम गंभीरची ‘गंभीर’ परीक्षा?
  • ऋजुता लुकतुके

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पहिल्या कसोटीवर आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व आहे. भारताचा पहिला डाव १५० धावांत संपल्यावर ऑस्ट्रेलियानेही आपले ७ खेळाडू झटपट गमावले आहेत. भारताच्या या कामगिरीमुळे ही कसोटी आता रंगतदार वळणावर उभी आहे. भारतीय संघासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची आहे. एकतर मागच्या दहा वर्षांमध्ये बोर्डर-गावस्कर चषकावर भारतीय संघाने वर्चस्व गाजवलं आहे आणि ते भारतीय संघाला सोडायचं नाही. दुसरं म्हणजे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान पुन्हा मिळवायचं असेल तर भारताला ही मालिका जिंकावीच लागणार आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

ऑस्ट्रेलियातील मागच्या दोन मालिका भारताने जिंकल्या असल्या तरी १९९२ नंतर पहिल्यांदाच भारतीय संघ इथं ५ कसोटींची मालिका खेळणार आहे. त्यामुळे हा दौरा भारतासाठी आव्हानात्मक असणार आहे. मागच्या दोन मालिका भारतीय संघाने जिंकल्या तेव्हा भारतीय संघाचे प्रशिक्षक असलेले रवी शास्त्री यांच्या मते आताही भारताला विजय मिळवायचा झाल्यास दोन खेळाडू महत्त्वाचे ठरणार आहेत. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा – Letter War : मल्लिकार्जुन खरगे आणि जे. पी. नड्डा यांच्यामध्ये रंगले लेटर वॉर)

फलंदाजीत यशस्वी जयस्वाल आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराह या दोन खेळाडूंची नावं त्यांनी आयसीसीच्या कार्यक्रमात बोलताना घेतली आहेत. ‘जयस्वाल सलामीला खेळतो. शिवाय तो घणाघाती फलंदाजी करतो. त्यामुळे त्याने सुरुवातीला येऊन ३०-४० धावा जरी केल्या, तरी तो सामन्याचं चित्रच बदलून जाईल. नंतर येणाऱ्या फलंदाजांसाठी काम सोपं होईल. तसंच बुमराहचं आहे. त्याने सुरुवातीलाच बळी मिळवले तर इतर युवा गोलंदाजांना तो विश्वास देऊ शकेल आणि त्यातून त्यांची कामगिरीही सुधारेल. म्हणून जयस्वाल आणि बुमराह संघासाठी महत्त्वाचे खेळाडू आहेत,’ असं रवी शास्त्री म्हणाले आहेत. (Border-Gavaskar Trophy 2024)

पर्थमध्ये पहिल्या दिवशी यशस्वी जयस्वाल शून्यावरच बाद झाला. त्यानंतर कोहली, पड्डिकल आणि राहुल यांची रांग लागल्यामुळे भारतीय फलंदाजी ढेपाळली. पहिला डाव १५० धावांवरच बाद झाला. पण, त्यानंतर जसप्रीत बुमराहने १० षटकांत फक्त १७ धावा देत ४ फलंदाज बाद केले आहेत. त्यामुळे भारतीय संघ कसोटीत परतला आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.