Border-Gavaskar Trophy 2024 : ऑस्ट्रेलियातील सराव सामना रद्द करण्यावरून गावस्करांनी टोचले भारतीय संघाचे कान

Border-Gavaskar Trophy 2024 : या मालिकेची तयारी भारताकडून पुरेसी होत नसल्याची टीका गावस्कर यांनी केली आहे. 

69
Border-Gavaskar Trophy 2024 : ऑस्ट्रेलियातील सराव सामना रद्द करण्यावरून गावस्करांनी टोचले भारतीय संघाचे कान
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघ बोर्डर-गावस्कर चषक मालिकेसाठी आता ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. सरावासाठी संघाकडे १० दिवसांचा अवधी आहे. पण, या कालावधीत कुठलाही सराव सामना भारतीय संघ खेळणार नाहीए. आधीपासून ऑस्ट्रेलियात असलेल्या ए संघाबरोबर एक सरावाचा सामना खेळण्याची योजना यापूर्वी बीसीसीआयने आखली होती. पण, हा सामनाही अचानक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे माजी कसोटीपटू सुनील गावसकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

आपल्या मिड-डे दैनिकातील स्तंभात सुनील गावस्कर लिहितात, ‘भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी सराव सामना रद्द करण्याचा निर्णय ज्याने कुणी घेतला असेल त्याने तो रद्द करावा. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी दरम्यान असलेल्या अध्यक्षीय संघाविरुद्धचा सामनाही २ दिवसांचा करण्यात आलाय. तो निर्णयही मागे घ्यावा. हे निर्णय अनाकलनीय आहेत.’ (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : धडक कारवाईत आत्तापर्यंत १० कोटी ७१ लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त)

घरच्या मैदानावर पराभव झालेला असताना ऑस्ट्रेलियात वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी फलंदाजांना हे सराव सामने आवश्यक होते, असं गावस्कर यांना वाटतं. ‘फलंदाजाला खरा आत्मविश्वास तेव्हाच मिळतो, जेव्हा तो खेळपट्टीवर काही वेळ घालवतो आणि चेंडू त्याच्या बॅटच्या मध्यभागी बसू लागतो. इतर कुठलाही सराव हा आत्मविश्वास फलंदाजाला देऊ शकत नाही. त्यामुळे या मालिकेची तयारी करण्यासाठी खरा उपाय सरावाचे सामने हाच आहे,’ असं गावस्कर आपला मुद्दा विषद करताना म्हणतात. (Border-Gavaskar Trophy 2024)

गोलंदाजांसाठीही प्रत्यक्ष सामन्याचा सरावच उपयोगी पडतो, असं गावस्कर यांना वाटतं. भारतीय संघाचा व्यस्त कार्यक्रम पाहता, या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी कुठलाही सराव सामना आयोजित झाला नव्हता. आधीपासून ऑस्ट्रेलियात असलेल्या भारत ए संघाविरुद्ध पर्थच्याच मैदानावर एक सराव सामना खेळवण्याचा विचार संघ प्रशासनाने केला होता. पण, आता अचानक हा सामना रद्द करून नेट्सची सत्र वाढवण्यात आली आहेत. त्यावर सुनील गावस्कर यांनी सडकून टीका केली आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.