Border-Gavaskar Trophy 2024 : पर्थमध्ये कसं आहे हवामान? पावसाची शक्यता किती?

Border-Gavaskar Trophy 2024 : २२ तारखेला भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिली कसोटी सुरू होत आहे. 

39
Border-Gavaskar Trophy 2024 : पर्थमध्ये कसं आहे हवामान? पावसाची शक्यता किती?
  • ऋजुता लुकतुके

सध्या क्रिकेट जगतात चर्चा सुरू आहे ती भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेची. बोर्डर-गावस्कर चषकातील पहिली कसोटी २२ नोव्हेंबरला पर्थमध्ये सुरू होत आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियातील दोन मालिका भारतीय संघाने जिंकल्या आहेत. त्यामुळे २०१४ पासून या चषकाचा ताबाही भारतीय संघाकडे आहे. पण, २००० पासून पहिल्यांदाच दोन्ही संघांदरम्यान ५ कसोटींची मोठी मलिका होत आहे. त्यामुळे या मालिकेविषयीची उत्सुकता वाढली आहे. २०१८ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली आणि २०२० मध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली होती. (Border-Gavaskar Trophy 2024)

आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या चषकावरील वर्चस्वाबरोबरच कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीसाठीही प्रयत्न करणार आहे. दोन संघांमध्ये अलीकडे झालेल्या कसोटी मालिकांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. पण, गेल्यावर्षी आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला होता. हा सामना इंग्लंडमध्ये झाला होता. (Border-Gavaskar Trophy 2024)

(हेही वाचा – तिवसा मतदारसंघात ‘मविआ’त बिघाडी; शरद पवार गट ब्लॅकमेल करत असल्याचा Yashomati Thakur यांचा आरोप)

सध्या ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये थोडंफार ढगाळ वातावरण आहे. पण, रविवारपर्यत इथली हवा चांगली असेल असं हवामान खात्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर दुपारी हवेत थोडा उकाडाही असेल. तापमान दिवसभर साधारणपणे २२ अंश सेल्सिअस इतकं असेल. तर दिवसा १७ किमी प्रती तास या वेगाने वारे वाहतील, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (Border-Gavaskar Trophy 2024)

पर्थ कसोटीसाठी भारतीय संघ – जसप्रीत बुमराह (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, अभिमन्यू ईश्वरन, के. एल. राहुल, रिषभ पंत, सर्फराझ खान, ध्रुव जुरेल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाशदीप, हर्षित राणा, नितिश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर व देवदत्त पड्डिकल

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.